
दि. २४ जुलै २०२५
खेड तालुका भाजपाचे युवा नेते , तालुका कार्याध्यक्ष मा. गणेशभाऊ गुंडाळ पाटील यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाचा वाढदिवस देखील सामाजिक उपक्रम राबवून मित्रपरिवाराच्या उपस्थितीत संपन्न केला.
खेड तालुक्यातील रेटवडी गावच्या दुर्गम आदिवासी डोंगराळ भागात मित्रपरिवारासह उपस्थित राहत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू – आनंद निर्माण करणारा शैक्षणिक वस्तूवाटप व खाऊ वितरणाचा कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम रेटवडीच्या ठाकरवस्ती येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या सभागृहात संपन्न झाला.या प्रसंगी रेटवडी ग्रामस्थांसह शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद , भाजपाचे कार्याध्यक्ष गणेश गुंडाळ , माजी सरपंच संजय बांगर , ग्रा.पं. सदस्य किरण पवार , तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष अक्षय भगत ,
सामाजिक कार्यकर्ते हर्षद चौधरी , संजय पवार , ॲड. संदीप देशमुख , समिर हिंगे. , सुभाष पवार , अमोल काळे , स्वप्नील पवळे , ओंकार गुंडाळ इ. मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक सामग्रीचे संपूर्ण किट व खाऊचे वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता.शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनाचे देखील याप्रसंगी सहकार्य लाभले. या सेवाभावी उपक्रमाप्रसंगी निवेदन सुप्रसिध्द निवेदक ,शिवव्याख्याते ॲड. संदीप देशमुख यांनी केले तर सर्वांचे आभार अमोल काळे यांनी मानले.