
“अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जन्मभूमी परिसरात हे आधुनिक पत्रकार भवन उभे राहात असल्याचा विशेष आनंद आम्हाला आहे. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने सुसज्ज असे पत्रकार भवन उभे राहात आहे. साडेचार – पाच कोटी रूपयांच्या खर्चातून हे अत्याधुनिक असे पत्रकार भवन उभे राहात आहे, ही बाबा सोपी नव्हे. भूखंडापासून निधी उभारणीपर्यंत अनेक अडथळ्यांवर मात करीत अध्यक्ष योगेश कामथे आणि त्यांच्या टीमने पत्रकार भवनाचे स्वप्न साकार केले आहे. महाराष्ट्रातील एक भव्य-दिव्य आणि सुसज्ज पत्रकार भवन म्हणून ओळखले जाईल” असे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅब पुजन कार्यक्रमात देशमुख बोलत होते. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅब पुजन पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप व अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते झाले. माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, साखरे उद्योग समुहाचे दिपक साखरे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार, सुनील वाळूंज, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तानाना भोंगळे, मार्गदर्शक बी.एम. काळे, प्रकाश फाळके, सुनील धिवार यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यारंभ करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष योगेश कामथे, उपाध्यक्ष प्रवीण नवले, सचिव अमोल बनकर, सहसचिव मंगेश गायकवाड, समन्वयक किशोर कुदळे, कोषाध्यक्ष निलेश भुजबळ, कार्यकारणी सदस्य राहुल शिंदे, समिर भुजबळ, संतोष डुबल, चंद्रकांत चौंडकर, जिल्हा प्रतिनिधी ए.टी. माने, महिला प्रतिनिधी सुजाता गुरव, छायाताई नानगूडे, यवतचे पत्रकार मनोज खंडागळे, हवेलीचे पत्रकार सुनील शिरसाट यांसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. “या पत्रकार भवनात राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांची निवास व्यवस्था, सुसज्ज ग्रंथालय, बँकेट हॉल, कॉन्फरन्स हॉल, पत्रकारांना बातम्या पाठविण्यासाठी कॉम्प्युटर, वायफाय व्यवस्था असणार आहे. वीजेचा खर्च टाळण्यासाठी सोलार पॅनल उभारण्याचाही मानस आहे. पुढिल काळात याठिकाणी अद्यावत जिम, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके, लेक्चर देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांची सोय केली जाणार आहे. पत्रकारीतेतील नवनवीन गोष्टी युवा पत्रकारांना माहिती होण्यासाठी याठिकाणी प्रशिक्षण मेळावे आयोजित करण्याचा मानस असल्याचे पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार संजय जगताप यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी नक्की पुर्ण करणार असुन, पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले. माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे यांनी ही शुभेच्छा दिल्या. पत्रकार संघाच्या इमारतीच्या कामासाठी रात्रंदिवस झाटणारे संघाचे सचिव अमोल बनकर यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. पुजनाचे पौराहित्य संतोष जंगम यांनी केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष योगेश कामथे यांनी केले. सुत्रसंचलन निलेश जगताप यांनी केले तर आभार बी.एम. काळे यांनी मानले फोटो : पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅबचे पुजन करतान मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व माजी आमदार संजय जगताप.