चाकण येथे अज्ञात व्यक्ती वय वर्ष 70 यांचे ओळख पटनाबाबत खालील फोटोवरील व्यक्ती कुणाच्या ओळखीचा असेल तर चाकण पोलीस स्टेशन संपर्क करा

Spread the love
चाकण प्रतिनिधी
पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करत आहे
आर.बी. पवार सह. पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे, पिपरी चिंचवड
अकस्मात मयत मधील अनोळखी इसमाचा तपास
उपरोक्त विषयास अनुसरुन सविनय सादर की, चाकण पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजि. नं. ५८/२०२५ मधील मयत एक अनोळखी इसम वय सुमारे ७० वर्ष (पुरुष) पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही यांचा दि.२७/०७/२०२५ रोजी मयत झाल्याचे मा. वैदयकीय अधिकारी सो ससुन सर्वेपचार रुग्णालय पुणे यांनी घोषीत केले आहे. त्याचा एमएलसी नं.:- २१८७८/२०२५ असा आहे. त्यानंतर एस. व्ही. गवारी पो.हवा १३९१ नेम चाकण पोलीस स्टेशन पि.चि यांनी ससुन सर्वेपचार रुग्णालय पुणे येथे मयताचा दोन पंचांसमक्ष इन्क्वेस्ट पंचनामा केला. मयताचे मरणाचे कारण समजून येणेकामी सदर मयताचा शव फॉर्म भरून मा. वैद्यकीय अधिकारी साो ससुन सर्वेपचार रुग्णालय पुणे यांचेकडे पी.एम होणे कामी मयत बॉडी सादरकेली असता तिचा एम.एल.पी.एम.नं.:-४११०/२०२५ दिनांक २९/०७/२०२५ अन्वये पी.एम. केले असून त्या अनोळखी मयत इसमाचे वर्णन खालीलप्रमाणे

नाव- एक अनोळखी पुरुष नांव पत्ता माहित नाही,
वय- सुमारे ७० वर्ष
शरीर बांधा सडपातळ
वर्ण – निमगोरा
उंची ५ बाय ५ फुट
अंगावर काळ्या रंगाचा फुल बाहयांचा शर्ट व फिक्कट निळ्या रंगाची
हाप जिन्स पॅट घातलेली आहे.
दाढी थोडी वाढलेली, डोक्याचे केस काळे पांढरे वाढलेले
तरी दाखल अकस्मात मयत मधील वरील अनोळखी इसमाची ओळख मिळण्यासाठी व त्याचा तपास होणेकामी वृत्तपत्रामध्ये प्रसिध्दीहोणेस विनंती आहे.
तपास अधिकारी आर. बी. पवार सहा. पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे, पि.चि मो.नं.७५८८८८२३४४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents