कैलास दुधाळे(प्रसिद्ध निवेदक) यांना आदर्श समाजसेवक

राजगुरुनगर
प्रतिनिधी चाकण
खेड तालुक्यातील माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास दुधाळे(प्रसिद्ध निवेदक) यांना आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पिंपरी चिंचवड कलाकार संघ आयोजित सोहळ्या सिने व नाट्य अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला भोसरीचे मा.आमदार विलास लांडे अखिल भारतीय मराठा चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले ज्येष्ठ नेते अशोक खांडेभराड,भाजपाचे नेते राम गावडे पिंपरी चिंचवड कलाकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार उलपे व कार्याध्यक्ष के.डी कड पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीब जनतेची सेवा दवाखाना असेल मोफत कपडे असेल, असे वेगवेगळे उपक्रम केल्याबद्दल त्यांना हा समाजसेवक पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल खेड तालुक्यातून आणि पंचक्रोशीतून सदिच्छा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.