

खेड तालुक्यातील शिरोली येथे सौ नंदा उर्फ सीमा कल्याणशील देखणे यांचा जल दान विधी आणि शोकसभा संपन्न झाली. यावेळी बौद्धाचार्य गुलाबराव कांबळे अशोक कडलक (पत्रकार, मा. शिक्षणाधिकारी) यांनी सर्व विधी घेतले. यावेळी शोकसभेचे अध्यक्षस्थान कुरुळी येथील गुलाबराव कांबळे यांनी स्वीकारले. त्यानंतर अशोकराव खांडेभराड लोकनेते शिवसेना, माजी सभापती किसन भाऊ नेहरे, रा.अर्बन बँक मा.अध्यक्ष सतीश नाईकरे,पुणे जिल्हा काँग्रेसचे नेते विजुभाऊ डोळस, मा.जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख, खरेदी-विक्री संघाचे संचालक संतोष दौंडकर, संतोष ढमाले, अनिल टोके, संतोष गोरडे,भारतीय जनता पार्टीचे शांताराम शेठ भोसले, सामाजिक कार्यकर्ते रामहरी आवटी, शिरोली गावातील सरपंच ,उपसरपंच, पोलीस पाटील आणि अनेक मान्यवरांनी शोक सभेमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या शोक सभेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे ऋण मा. पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक आणि शिरोली शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कल्याणशील देखणे यांनी केले. त्यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ आदर्श विद्यालयास एक लाख रुपयाची ठेव कायमस्वरूपी ठेवण्यात येणार आहे. आणि त्या ठेवीवरून येणाऱ्या व्याजातून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करावं असे त्यांनी स्पष्ट मत मांडले. यावेळी शिरोली गावातील विविध संस्थांच्या आजी-माजी पदाधिकारी , ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतून अनेक मान्यवर शोक सभेला उपस्थित होते.या शोक सभेचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक गोरक्षनाथ पवळे यांनी केले.