निसर्गवासी पी. टी. शिंदे यांचा तिसरा स्मृतिदिन साजरा

Spread the love
कडूस:-(वार्ताहर)संपुर्ण देशात सुप्रसिद्ध अशा रानमळा पॅटर्न चे जनक पी. टी शिंदे गुरुजी यांचा तिसरा स्मृतिदिन नुकताच रानमळा (कडुस) येथे साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष  सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे तर प्रमुख पाहुणेसागर शेलार मा.सरपंच मिरवडी(दौंड) हे उपस्थित होते.
 
   अध्यक्षीय भाषणात रंगनाथ नाईकडे यांनी पर्यावरण रक्षण आणि संवर्धन हे का गरजेचे आहे व त्यासंबंधी उपाययोजना विशद करत  पी. टी. शिंदे प्रणित रानमळा पॅटर्न देशभर कसा स्वीकारला गेला हे सांगितले.सागर शेलार यांनी मनोगतातून पी टी शिंदे यांच्या कार्याचा आढावा घेतला.
   या प्रसंगी रानमळा शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक फळरोप देऊन ,दरवर्षी उत्कृष्ट वृक्षसंवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मा. पं.स. सदस्या  श्रीमती मंगला शिंदे शिवनेर उद्योग समुहाचे  सागर शेलार यांचे वतीने रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष होते.
  सदरच्या कार्यक्रमासाठी पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष मिलिंद शिंदे ,सचिव राजन जांभळे ,जि.रं शिंदे ,मधुकर खेडकर ,ग्रामविकास प्रतिष्ठान रानमळाचे अध्यक्ष यादवराव शिंदे ,कैलास दुधाळे ,रानमळा ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाबाजी शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन उल्हास भुजबळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents