
चाकण नगरपरिषद तर्फे
जागतिक दिव्यांग दिन साजरा
चाकण नगरपरिषद तर्फे “जागतिक दिव्यांग दिन” निमीत्ताने चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. सुनील बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण शहरातील नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थीची नगरपरिषदकार्यालयमध्ये सभा घेण्यात आली. नगरपरिषदेच्या अंदाजपत्रक रक्कमेच्या ५% निधी शासनाच्या निर्देशाप्रमाणे १४३ दिव्यांग लाभार्थींना प्रत्येकी रक्कम
रुपये ५०००/- प्रमाणे एकूण रक्कम रूपये ७,१५,०००/- वाटप करण्यात आले.तसेच दिव्यांग व्यक्तीचे मतदार यादी मध्ये नोंदणी करण्यात आली.
सदरकार्यक्रम मा. उपमुख्याधिकारी राजेंद्र पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी चाकण ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कालीदास वाडेकर उपस्थित होते. दिव्यांग लाभार्थी तर्फे चंद्रशेखर मंडलिक ,लहु लांडे यांनी विचार व्यक्त केले व नगरपरिषदेने दिव्यांग व्यक्तिला लाभ दिल्याने आभार मानले ,सदरकार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन नगरपरिषदेचे लिपिक विजय भोंडवे यांनी केले.