

ता. भोर, गोरड म्हसवली या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरास 50 वर्ष पूर्ण झाले मुळे सुवर्ण महोत्सव हरीनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता सदर हरीनाम सप्ताह मध्ये काकड आरती, श्री संत ज्ञानेश्वर महाराज महाराजांच्या पारायण, प्रवचन, कीर्तन, जागर व काळभैरव महाराज छबिना आयोजन करण्यात आले होते
ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील, लक्ष्मण महाराज पाटील, डांगे महाराज, नीलेश महाराज कोरडे, चैतन्य महाराज वाडेकर अशा अनेक दिग्गज महाराजांची कीर्तन प्रवचन रुपी सेवा झाली त्यांनी गावातील तरुण मुलांना जेष्ठ नागरिकांना समाज प्रबोधन करून समाज सुधारणेची दाखले दिले. सदर सुवर्ण महोत्सवाची सांगता काल्याचे कीर्तनाणे होऊन श्री संतश्रेष्ठ ndyaneshwar महाराज पालखी सोहळ्याचे मालक ह.भ.प. बाळासाहेब महाराज आरफाळकर हे उपस्थित होते. गावातील तरुण मुलांनी व ग्रामस्थ मंडळ गोरड म्हसवली यांनी आपापले अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेऊन एकजुटीने करून पंच कृषीत आदर्श निर्माण केला आहे.
अशी माहिती महाराष्ट्र पोलीस अनिल वसंतराव गोरड यांनी दिली