

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर दोन शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. अष्टपैलू शिक्षकमित्र व्यक्तिमत्व इंदुमती पवार मॅडम व जितेंद्र डेरे सर यांचे सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. तसेच, विद्यार्थिनींसाठी सूचना व तक्रारपेटी बसविण्यात आली.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका कमलताई खेडकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बालसभेचे आयोजन करण्यात आले.बालसभेचे नियोजन वंदना गोडसे मॅडम व स्वाती गावडे मॅडम यांच्या विद्यार्थिनीने करत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.