
15 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी चाकणच्या 62 विद्यार्थ्यांची निवड
वार्ताहर- चाकण
दि. 17 जानेवारी
चाकण येथील सारा अबॅकस अकॅडमी आणि संतोष ऑल राऊंडर अकॅडमी यांच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय अॅबॅकस महामंडळ, तैवान (IAMA, Taiwan) आयोजित अॅबॅकस, सुंदर हस्ताक्षर, वैदिक गणित, फोनिक्स आणि चित्रकला या कोर्सेससाठी 15 वी राष्ट्रीय स्पर्धा 8 जानेवारी 2023 रोजी चाकण येथील केले आहे. या 15 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चाकण येथील सर्व कोर्सेस मिळून 154 विद्यार्थी सहभागी झाले होते. पुणे विभागातील 13 जिल्ह्यातील 800 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
यापैकी 89 विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेच्या दुसऱ्या आणि फायनल राऊंडसाठी निवड झाली आहे. यातील 62 विद्यार्थी चाकण येथील आहेत. या 62 विद्यार्थ्यांचा दुसरा आणि फायनल राऊंड 22 जानेवारी रोजी मुंबई येथे होणार आहे. फायनल राऊंडसाठी मुंबई येथे संपूर्ण देशातून 2200 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा रोज एक तास सराव नियमितपणे संतोष ऑल राऊंडर अकॅडमी, चाकण येथे सुरू आहे. विद्यार्थी कठीण, क्लिष्ट प्रकारचे विविध गणिताचे शंभर उदाहरणे तीन आणि पाच मिनिटांमध्ये विना अबॅकस व अबॅकसच्या साहाय्याने सोडवतात. संतोष ऑल राऊंडर अकॅडमी आणि सारा अबॅकस अकॅडमीच्या प्राचार्या सौ. अर्चना प्रविण आघाव, डायरेक्टर प्रा.प्रविण बाबुराव आघाव यांच्यासह सर्व सहशिक्षक हे या विद्यार्थ्यांना दिड महिना मार्गदर्शन करत होते.
आंतरराष्ट्रीय अॅबॅकस महामंडळ, तैवानचे भारताचे प्रतिनिधी डॉ. डायरेक्टर प्रविण आघाव यांनी ही माहिती दिली.
