

दिनांक २४/०२/२०२५ रोजी रात्री ०१/३० वा. चे सुमारास मौजे बहुळ ता. खेड, जि. पुणे गावाचे हद्दीतील फुल सुंदरवस्ती येथील फिर्यादी राहते घरी अनोळखी पाच ते सहा चोरट्यांनी फिर्यादी यांचे राहत्या घराचे हॉलचे दरवाजाची आतील कडी कोयंडा कटावणीने तोडून आतमध्ये प्रवेश करुन फिर्यादी व घरातील सदस्यांना मारहाण करुन सोन्याचे ऐवज व रोख रक्कम असा एकुण १,३२,०००/- रुपये चोरी करून बाजचे दुसया बेडरुमचे दरवाजाची कडी कोंयडा कटावणीने तोडून आतमध्ये प्रवेश करुन साक्षीदार अशोक वाडेकर व त्यांची पत्नी उज्वला वाडेकर यांना चाकूचा धाक दाखविला ते ओरडल्याने त्यांना चोरट्यांनी चाकूने व तलवारीने पोटात गंभीर वार करुन लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याने फिर्यादी नामे जयराम लक्ष्मण वाडेकर रा. बहुळ यांचे तक्रारीवर गुन्हा दाखल होता. तसेच यापुर्वी शेलपिंपळगाव येथे अनिकेत दौंडकर यांचे घरावर दसरा सणाचे दिवशी वरील पध्दतीचा अवलंब करून दरोडयाचा गुरनं ७१९/२०२४ बी एन एस कलम ३१० (२), ३११ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांचेकडुन तपास चालु होता. नमुद वरील दोन्ही गुह्यामध्ये सहा अनोळखी इसमांनी सशस्त्र दरोडा टाकून घरातील सदस्यांना शस्त्राने गंभीर दुखापती करून सोने व रोख रक्कम मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता.
सदर दरोडयाचे गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हयाचे घटनास्थळी मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे, संदीप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सचिन हिरे यांनी भेट देवुन चाकण पो स्टे चे वपोनि प्रमोद वाघ यांना गुन्हा उघड करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाचे सपोनि श्री. प्रसंन्न जराड, पोहवा हनुमत कांबळे, पोलीस अमंलदार सुनिल भागवत, महादेव बिक्कड, रेवननाथ खेडकर, किरण घोडके, महेश कोळी यांचे स्वतंत्र पथक तयार करुन नमुद गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आदेशीक केले होते. तपास पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी बाबत कोणताही मागमूस नसताना पारंपारीक बातमीदार नेमुन त्यांचेकडुन गोपनिय माहिती तसेच तांत्रीक माहितीच्या आधारे सलग १५ दिवस अहिल्यानगर जिल्हयात श्रीगोंदा, पारनेर, नगर तालुका, बीड जिल्हयातील आष्टी व पाटोदा या ठिकाणी गुन्ह्याचा तपास करून गुन्हा करणारे सहा आरोपी १) परश्या गौतम काळे, रा. देऊळगांव गलांडे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, २) सचिन चंदर भोसले, रा. खरातवाडी, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर, ३) भिमा आदेश काळे, रा. देऊळगांव गलांडे, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर, ४) धंग्या चंदर भोसले, रा. खरातवाडी, ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर ५) राजेश अशोक काळे रा. रांजनगाव मज्जीद ता. पारनेर जि. अहिल्यानगर, ६) अक्षय ऊर्फ किशोर हस्तलाल काळे, रा. पिंपळगांव पिस्सा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर ७) विधीसंघर्षीत बालक यांनी केला असल्याचे निष्पंन्न केले, त्यापैकी पाच आरोपींना अटक करून करुन त्यांचेकडे गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी काहीही सहकार्य न करता गुन्हयाविषयी माहिती न सांगता तपास पथकाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी पारंपारीक पध्दतीचा अवलंब तसेच Interrogation Skills चा योग्य वापर करुन ताब्यातील आरोपींकडे विचारपुस केली तेंव्हा वरील आरोपींनी मिळुन दरोडयाचे व घरफोडयाच्या गुन्हयांची कबुली दिली.
आरोपींतांनी चोरी केल्यानंतर गुन्हयातील चोरीचा मुददेमाल हा सोनार आरोपी अभय विजय पंडीत, वय ३८ वर्षे, रा. सुतार गल्ली, कोळगांव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर यास विक्री केलेला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास अटक केली आहे. मुख्य आरोपी सचिन चंदर भोसले व इतर सहकारी यांना गुन्हा केलेला आहे हे माहिती असुनही आरोपींना आश्रय देणारा व लपवुन ठेवणारा आरोपीतांच्या बहीनीचा पती गणेश शिवाजी काळे, रा. तांदळी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर यास आरोपी करुन गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
सदर गुन्हयातील अटक आरोपी यांनी चाकण पोलीस स्टेशन हददीत यापुर्वी दरोडा तसेच घरफोडी सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्याची कबुली दिलेली असुन त्यांचेकडुन खालील गुन्हयांची उकल झालेली आहे.
अनं
१
२
३
४
५
६
पोलीस स्टेशन
गुन्हा रजिस्टर नंबर व कलम
चाकण पोलीस स्टेशन
११४/२०२५ बी.एन.एस. कलम ३१० (२), ३११, ३१७ (२) प्रमाणे
चाकण पोलीस स्टेशन
७१९/२०२४ बी.एन.एस कलम ३१० (२), ३११ प्रमाणे
चाकण पोलीस स्टेशन
८१/२०२५ बी.एन.एस कलम ३३१ (४), ३०५ (ए) प्रमाणे
चाकण पोलीस स्टेशन
५०३/२०२४ बी.एन.एस कलम ३३१ (४), ३०५ (ए) प्रमाणे
चाकण पोलीस स्टेशन
५९७/२०२४ बी.एन.एस कलम ३३१ (४), ३०५ (ए) प्रमाणे
चाकण पोलीस स्टेशन
१३१/२०२४ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे
सोनार आरोपी अभय विजय पंडीत यास आरोपींनी चोरुन आणलेले सोन्याचे दागीने हे गुन्हयातील मुददेमाल आहे असे माहित असुनही तसेच आरोपी हे रेकॉर्ड वरील कुविख्यात दरोडेखोर आहेत हे माहिती असुनही सोनाराने विकत घेतलेले एकुण १२ लाख रुपये किंमतीचे १३० ग्रॅम सोन्याचे दागीने, व आरोर्पीकडुन रोख रक्कम जप्त केलेली आहेत. आरोपींनी श्रीगोंदा ते बहुळ व शेलपिंपळगाव चाकण येथे गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या तीन मोटार सायकल व घरफोडीची हत्यारे, मारहाण करण्यासाठी वापरलेली पालघन, तलवार, चाकु तसेच लोखंडी कटावणी, खुटटा असा एकुण सुमारे १५ लाख रुपयांचा मुददेमाल दरोडयाचे गुन्हयाचे तपासी अधिकारी पोनि गुन्हे श्री. नाथा घार्गे यांनी जप्त केलेल्या आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ, पोनि गुन्हे श्री. नाथा घार्गे, तपास पथकाचे प्रमुख सपोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि गणपत धायगुडे, पोसई दत्तात्रय सुकाळे पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे, दत्ता टोके, राजु जाधव, अनिकेत पाटोळे, भैरोबा यादव, सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, रुषीकुमार झनकर, सुदर्शन बर्डे, नवनाथ खेडकर, सुनिल भागवत, उध्दव गर्जे, महेश कोळी, महादेव बिक्कड, रेवनाथ खेडकर, शरद खैरणार, किरण घोडके, विकास तारु, कैलास गर्जे, प्रतिक चव्हाण यांनी केलेली आहे.
(डॉ. शिवाजी पवार) पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३, पिंपरी चिंचवड