


प्रतिनिधी लहू लांडे
खेड तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत खरपुडी बुद्रुक तालुका खेड या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. खरपुडी बुद्रुक गावचे आदर्श सरपंच, विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे, चेअरमन सतीश तनपुरे ,ग्रामसेविका दिपाली भोर, उपसरपंच श्रीमती सरस्वती काशीद , मा. चेअरमन तानाजी बरबटे,सदस्य प्रणील चौधरी, गुलाबाई चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष ह .भ. प. दिलीप गायकवाड, ग्रामपंचायत आदर्श कर्मचारी नवनाथ बरबटे पा. पु. कर्मचारी स्वप्निल भोगाडे, विश्वनाथ शिंदे, तानाजी भोगाडे, गावातील सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते