
शिक्रापूर ता. शिरूर : जेजुरी बेल्हे राज्य मार्गावर धामारी येथील रस्त्यावर आयशर टेम्पो दुचाकी ची धडक होऊन खडकवाडी ( ता. आंबेगाव ) येथील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. विजया दिलीप डोके, संकेत दिलीप डोके, ओंकार चंद्रकांत सुक्रे अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
शुक्रवारी दि.03 रात्री साडे आठच्या सुमारास घटना घडली
याबाबतची माहिती अशी की संकेत डोके हा आपली आई विजया डोके यांना शिक्रापूरला सोडवण्यासाठी निघाला होता यासाठी त्यांनी आपला मित्र ओंकार सुक्रे याला सोबतीला घेतले होते परंतु गंगासागर नजीक एका आयशर टेम्पो ने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला.या अपघातामध्ये तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रतिनिधी .सचिन दगडे शिरूर तालुका