

वराळे : वार्ताहर
दि. 8 फेब्रुवारी
वराळे येथील लर्निंग ट्री इंग्लिश मिडीयम स्कूलचे अबॅकस, सुंदर हस्तक्षार कोर्सेस मधून 21 विद्यार्थी 15व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यातील 8 विद्यार्थी संपूर्ण देशात सहाविजेते आणि उपविजेते झालेले आहेत.
सहभागी विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्पर्धेचा पहिला राऊंड 8 जानेवारी रोजी चाकण येथे पार पडला. यामध्ये लर्निंग ट्री इंग्लिश मिडीयम स्कूलचे 4 सहाविजेते झाले. आणि 4 विद्यार्थ्यांची निवड मुंबईच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या दुसऱ्या आणि फायनल राऊंडसाठी होऊन या विद्यार्थ्यांची 22 जानेवारी रोजी स्पर्धा होऊन चारही विद्यार्थी विजेते झाले. हे विद्यार्थी चाकण येथील चाकण येथील संतोष अकॅडमी आणि सारा अबॅकस अकॅडमीमधून सहभागी झाले होते.
स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा रोज एक तास सराव नियमितपणे स्कूलमध्ये सुरू होता. विद्यार्थी कठीण, क्लिष्ट प्रकारचे विविध गणिताचे शंभर उदाहरणे पाच मिनिटांमध्ये अबॅकसच्या साहाय्याने सोडवतात. या विद्यार्थ्यांना सौ. संध्या जाधव आणि स्कूलच्या सर्व शिक्षक वृंदाने मार्गदर्शन केले.
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये 2 फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला.
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. शरद भाऊ बुट्टे पाटीलआणि मुख्याध्यापिका सौ. सुनीता बुट्टे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्रतिनिधी..संपादक लहुजी लांडे