आज दिनांक ०९/०२/२०२३ रोजी संयुक्त ग्रामपंचायत कार्यालय पिंपळवंडी येथे आळेफाटा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पी. आय. श्री. नलावडे साहेब यांचा सत्कार महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, तसे पिंपळवंडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

Spread the love
आज दिनांक ०९/०२/२०२३ रोजी संयुक्त ग्रामपंचायत कार्यालय पिंपळवंडी येथे आळेफाटा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पी. आय. श्री. नलावडे साहेब यांचा सत्कार महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, तसे पिंपळवंडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी आदरणीय नलावडे साहेब यांनी गावांमध्ये कायदा सुव्यवस्था राखणे संदर्भात तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला यांना सतर्क राहण्याचे तसेच संरक्षणार्थ प्राथमिक उपायोजना संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी पुणे जिल्हा परिषद गटनेते शरदराव लेंडे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथशेठ लेंडे, पंचायत समिती सदस्य शामराव माळी, शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश अण्णा काकडे, तंटामुक्ती अध्यक्ष पिराजी शेठ टाकळकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव वाकचौरे, शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुका अध्यक्ष संजय भुजबळ, माजी सरपंच हेमलता सोनवणे, पोलीस पाटील इरफान तांबोळी, संदीप कसबे, तंटामुक्ती उपाध्यक्ष अनिता कोकाटे, सर्व तंटामुक्ती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान नाना काकडे, सचिन ठाणेकर, साधना भाभी चोरडिया, दैनिक सकाळचे पत्रकार पत्रकार सिद्धार्थ कसबे आधी उपस्थित होते.

प्रतिनिधी संपादक लहुजी लांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents