

बिबी ग्रामपंचायत सरपंच निवडणूक बिनविरोध करणेत आली फसाबाई महादू चतुर यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे त्यांची सरपंच म्हणून निवड करणेत आली
या प्रसंगी अरुण आण्णा गुंडाळ, सदस्य, सरपंच सुजाताताई भोर, उपसरपंच सतिशभाऊ जैद, सदस्य दिपक कालेकर ,रवींद्र बुरसे,संगीताताई तनपुरे, सोनाबाई दोरे, मंगल बुरसे ,मंडलाधिकारी सविता घुमटकर, तलाठी रवींद्र केगले, शिपाई हरी भांगे, तंटामुक्त अध्यक्ष पंढरीनाथ जैद,पोलीस पाटील संतोष भोर, दिनकर जैद ग्रामसेवक कल्याणी राजगुरू, व ग्रामस्थ उपस्थित होते.नवनियुक्त फसाबाई महादु चतुर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल गावातील ग्रामस्थ यांनी त्यांचा सत्कार केला.तसेच संपुर्ण तालुक्यातुन पाहुणे व गावातील ग्रामस्थ यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.नवनियुक्त सरपंच यांनी सांगितले की सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन गावाचा विकास करणार असल्याचे सांगितले.त्याच प्रमाणे शासनाच्या असणाऱ्या सर्व योजना गावातील ग्रामस्थ व महिला भगिनीं यांच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले
माननीय मनोहर गोरगल्ले पुणे जिल्हा प्रतिनिधी लहुजी लांडे