
चाकण ता.खेड येथील रहिवासी श्री अशोक गणपतराव धाडगे यांची ज्येष्ठ कन्या मनीषा, आणि श्री एकनाथ आनंदराव रंगारी रा.मोशी ता.हवेली जिल्हा पुणे यांचे सुपुत्र संतोष यांचा आंतरजातीय विवाह सोहळा दिनांक. 7 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी शिरोली ता. खेड येथील कृष्णपिंगाक्ष या मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी खेड तालुक्याच्या राजकीय क्षेत्रातील मातब्बर मान्यवरांची या विवाह सोहळ्याला उपस्थिती होती. प्रारंभी वधू-वर कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित मान्यवर व प्रमुख पाहुणेमंडळीचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.अनिष्ट जातीय व्यवस्थेत क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणणाऱ्या, या मंगलमय विवाह सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य मा. किरण शेठ मांजरे , बीजेपी पुणे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास दादा वाडेकर ,स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे बंधू मा नितीन शेठ गोरे, चाकण नगरपरिषद माजी नगराध्यक्ष शेखर भाऊ घोगरे, शिवसेना खेड तालुका अध्यक्ष आबा धनवटे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री मा.रामदासजी आठवले व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.पोपट शेठ घनवट यांचे प्रतिनिधी व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव मा.सचिनभाऊ वाघमारे,व्यापारी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष मा. अविनाश दुधावडे मा.विजय करगळ,मा.धनजय पानसरे,मा.वैजनाथ मुगावकर,मा.बसवराज हिगमिरे आणि संत निरंकारी मंडळाचे प्रमुख मा. मधुकर गोसावी, मा. नरेंद्र राजपूत, मा. वैभव जाधव, मा. राजेंद्र सासवडे, मा अण्णासाहेब जगताप मा. विठ्ठल दीक्षावंत व यांचे प्रतिनिधी बहिजी माहात्म्य उपस्थिती होते तसेच या सोहळ्याचे मुख्य आयोजक एकनाथ रंगारी परिवार तसेच धाडगे परिवार व मित्रपरिवार प्रामुख्याने मा सचिन भाऊ वाघमारे मा.किशोर भाऊ अहिरे यांच्यासह रंगारी व धाडगे कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट व इतर क्षेत्रातील मान्यवर वरील विवाहासाठी केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब व मा.पोपट शेठ घनवट यांचा या विवाह सोहळ्यासाठी विशेष पत्र रूपी आशीर्वाद प्राप्त झाला त्याचबरोबर संत निरंकारी मंडळाचे पुणे जिल्ह्याचे प्रमुख ताराचंद जी यांनी देखील शुभेच्छा संदेश पाठवला