

घोडेगाव (पुणे): निरंकारी ‘सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज’ यांच्या कृपाशिर्वादाने ‘संत निरंकारी मिशन’ ची सामाजिक शाखा ‘संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशन’ द्वारा आळेफाटा विभाग अंतर्गत घोडेगाव शाखेच्या वतीने मंगळवार, दि. ०७ फेब्रुवारी, २०२३ रोजी ‘घोडेगाव’ येथे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय व परिसरात स्वच्छता अभियान संपन्न झाले. या स्वच्छता अभियानाचे उदघाटन ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक श्री नंदू वणवे साहेब यांच्या शुभहस्ते व सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीकांतजी (आण्णा) गाढवे यांच्या उपस्थित झाले. यावेळी संत निरंकारी मिशन घोडेगाव शाखेचे प्रमुख श्री अजितजी कोकणे सह स्थानिक प्रबंधक उपस्थित होते. मिशनचे पंचक्रोशीतील अनेक अनुयायी व गावातील स्वयंसेवक यांचे या शिबिरा मध्ये विशेष योगदान लाभले .
निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांची शिकवण आहे, “प्रदूषण आतील असो की बाहेरील , दोन्हीही हानिकारक आहे !” या उक्तीला सार्थ ठरवत या अभियानात सुमारे ४०-५० स्वयंसेवकांनी स्वच्छता दूत बनून पुणे जिल्यातील अग्रगण्य ‘घोडेगाव’ येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय व परिसर स्वच्छता अभियानात प्लास्टिक कचरा, प्रसाधनगृह, रहिवासी इमारत, नाले, रस्ता, पार्किंग परिसराची साफ-सफाई सकाळी ९.३० ते ११.३० यावेळेत करण्यात आली व जमा झालेल्या १७ बॅग्स प्लास्टिक कचरा/गवत/झाडांची पाने/अनावश्यक वृक्षवेली इत्यादी रुग्णालय कर्मचारी यांच्याकडे ग्रामपंचायत घंटागाडीद्वारे विल्हेवाट लावण्याहेतू सुपूर्द करण्यात आल्या.
या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री.गाढवे म्हणाले की, “दरवर्षी संत निरंकारी मिशन अश्याच प्रकारे साफ-सफाई तथा स्वच्छता अभियान राबवून रुग्णालय, देवस्थान किंवा स्थानिक ग्रामपंचायतीला नेहमी सहकार्य करतच असतात आणि ‘मानव सेवा, हीच ईश्वर सेवा’ यांचे ब्रीद समजून घोडेगावच्या भागात वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.’
संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये जनसेवेचे अनेक उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
वरील अभियान हे सर्व स्वयंसेवकांच्या सहकार्याने श्री दिपकजी कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले
प्रतिनिधी. संपादक.लहु लांडे