
शिक्रापूर : शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे हल्ले तसेच नागरिकांना दर्शन होत असतात
नुकतेच पुणे नगर महामार्ग खंडाळा माथा येथे राजयोग हॉटेल समोर सकाळच्या सुमारास अज्ञात वाहण्याचे धडकेत एका बिबटया चा मृत्यू झाला आहे
कोंढापुरी ता.शिरूर पुणे नगर महामार्गावर आज पहाटे च्या सुमारस एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटया मृत झाल्या असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळाली त्यानंतर वनपाल गणेश म्हेत्रे वन मंजूर हनुमंत कारकोड आनंदा शेवाळे वन्यजीवन सामाजिक संस्थेचे शेरखान शेख यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता अंदाजे सात ते आठ वर्षे वयाची मादी अज्ञात वाहनाच्या धडकेत मयत झाल्याचे निर्दशनास आले. दरम्यान वन विभागाने पंचनामा करत बिबट्याला ताब्यात घेत शवविच्छेदन करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उपस्थित मृत बिबट्याचे दहन केले आहे.
कु. सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432 / 9665348432