
शिक्रापूर ता.शिरूर : निमगाव म्हाळुंगी येथील ओढ्यालगत एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यू ची नोंद केली आहे.
निमगाव म्हा. येथील अरविंद भवरे हे नागवडे वस्ती येथील ओढ्यालगत गेले असताना त्यांना अनोळखी व्यक्ती चा मृतदेह आढळून आला. याबाबत ची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैभव पवार,रणजित पठारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे, हवालदार अमोल चव्हाण,पोलीस पाटील किरण काळे यांसह आदींनी धाव घेतली त्यांना त्याच्या अंगात काळी पॅन्ट,काळसर शर्ट होता,याबाबत निमगाव म्हा.चे पोलीस पाटील किरण अंकुशराव काळे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे. पुढील तपास हवालदार अमोल चव्हाण करीत आहे.
कु. सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/9665348432