आज दिनांक 15/02/2023 सकाळी 7.15 वा मौजे चाकण येथील जामा मस्जिद चाकण बाजारपेठ ता. खेड, जि. पुणे येथे बिबट वन्यप्राणी सिसिटीव्ही कॅमेरा

Spread the love
आज दिनांक 15/02/2023 सकाळी 7.15 वा मौजे चाकण येथील जामा मस्जिद चाकण बाजारपेठ ता. खेड, जि. पुणे येथे बिबट वन्यप्राणी सिसिटीव्ही कॅमेरा मध्ये दिसेलेचे श्री. कालिदास वाडेकर यांनी पाहिला असता पुण्य नगरी चे पत्रकार श्री. दुधवडे यानी सकाळी 7.30 मी श्री. योगेश महाजन वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण यांना भ्रमणध्वनीदवारे कळविले. सदर मिळालेल्या माहितीच्या आधारे श्री. योगेश महाजन साहेब यांनी त्यांचे अधिनिस्त वनपरिक्षेत्र कार्यालय चाकण व खेड चे सर्व वनकर्मचारी तसेच चाकण रेस्क्यू टिम सदर ठिकाणी 8.00 वा पोहचले सदर ठिकाणी बिबट हा वन्यप्राणी हा चाकण बाजारपेठेतील भरवस्तीमधील 4 ते 5 गुठे झुडपे असलेली जागेमध्ये असलेची खात्री झाली. तदनंतर महाजन सर यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधुन उप वनसंरक्षक जुन्नर मा. श्री. अमोल सातपुते साहेब यांचे मार्गदर्शनाखाली माणिकडोह बिबट निवारण केंद्र माणिकडोह येथील एस. ओ. एस. टिम चे श्री. महेंद्र ढोरे सर व डॉ. चंदर सर हे घटनास्थळी दाखल झाले व वनकर्मचारी सर्व तसचे रेस्क्यू टिम मेंबर्स श्री. अतुल सवाखंडे सर, बापुसाहेब सोनवणे सर, शांताराम गाडे सर यांचे मदतीने बिबट या वन्यप्राण्यास तीन तासाचे कालावधीत सकाळी 11.30 वा. रेस्क्यू करण्यात आले. सदर बिबट वन्यप्राणी 1 अंदाजे वय वर्ष 02 या वन्यप्राण्याला तपासणीसाठी माणिकडोह बिबट निवारण केंद्र – माणिकडोह येथे दाखल करणेत आलेले आहे
सदर बिबट या वन्यप्राण्यास रेस्क्यू करणेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन साहेब, चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षण श्री. वैभव शिंगारे साहेब, सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. विक्रम गायकवाड, पोलिस उपनिरिक्षक श्री. विनोद खेडकर, श्री. अमोल डेरे, श्री. सागर बामणे व इतर पोलिस कर्मचारी तसेच वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी वनपाल श्रीम. योगिता नायकवाडी श्री. एन. एम. आरुडे, श्री. संतोष आगरकर, श्री. सचिन जाधवर तसेच वनरक्षक श्री. अचल गवळी, किशोर लोखंडे, योगेशवर पाटोळे, बालाजी पोत्रे, सागर चव्हाण तसेच श्रीमती रावते मॅडम, काने मॅडम, उबाळे मॅडम, जगताप मॅडम तसेच वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी व चाकण रेस्क्यूटिम चे सर्व सदस्य, चाकण नगरपालिका कर्मचारी, अग्निशामक दल, इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकार तसेच स्थानिक नागरिकांनी सदर बिबट वन्यप्राणी रेस्क्यू करणेसाठी मदत करण्यात आली. प्रतिनिधी संपादक लहु लांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents