
शिक्रापूर ता.शिरूर : शिक्रापूर येथे पुणे नगर महामार्गावर डॉक्टर दाम्पत्याच्या कारला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर सोनाली मच्छिंद्र खैरे यांचा जागीच मृत्यू झाला असून व डॉक्टर मच्छिंद्र नारायण खैरे हे गंभीर जखमी झाले आहे.
शिक्रापूर येथील खैरे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर मच्छिंद्र खैरे व डॉक्टर सोनाली खैरे हे दोघे आज पहाटे च्या सुमारास त्यांच्या( MH12HN3553) कारमधून पुणे नगर महामार्गावरील साई सहारा पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरून परत येत असताना रस्ता ओलांडण्यासाठी पुणे बाजूकडे येत असताना अहमदनगर बाजूने वेगाने आलेल्या( MH12 QJ7447)या ट्रकची खैरे यांच्या कारला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला त्यामध्ये कारचा पुढील निम्मा भागात मध्ये गेला यावेळी कारचा डाव्या बाजूला बसलेल्या डॉक्टर सोनाली मच्छिंद्र खैरे ( वय – 37 )यांचा जागीच मृत्यू झाला, तर डॉक्टर मच्छिंद्र नारायण खैरे हे गंभीर रित्या जखमी झाले आहे, त्यांना शिक्रापूर येथे खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले होते परंतु त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
सदर या अपघाताची माहिती डॉक्टर कैलास बाळासाहेब बांदल यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पवन भगवान साठे (वय – 25 रा.किनी ता. जळगाव जि. बुलढाणा )विरोधात गुन्हा दाखल केला आहे
कु. सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432 / 9665348432