

पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी खंडोबाची फाटा येथे सोमवारी दिनांक 13रोजी रात्री 17 महिलांना धडक देऊन पाच महिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला वाहन चालक व अपघात ग्रस्त वाहन खेड पोलिसांनी 36 तासांच्या आत ताब्यात घेतले आहे. वाहन चालक आरोपीचे नाव कानिफनाथ बबन कड वय 24 वर्षे राहणार संतोष नगर वाकी तालुका खेड असे आहे. त्याने अपघात घडल्यावर खेड तालुक्यातील दुर्गम भागातील हेद्रुस गावात आपल्या नातेवाईकांकडे गाडी लपवून व स्वतः सुद्धा लपून बसला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कानिफनाथ कड हा वाहन क्रमांक एम एच 14 एफ एस 9033 घेऊन पिंपरी फाटा येथे पैसे देण्यासाठी रात्री 10-30 वाजता शिरोली गावाकडे येत होता. गाडी वेगात असल्याने भीषण अपघात झाला. त्यात पाच महिलांचा मृत्यू झाला व चार महिला गंभीर जखमी झालेल्या होत्या. वाहन चालक घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहन घेऊन फरार झाला होता. पोलिसांना वाहन चालकाबाबत कोणतीही माहिती नसताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांचे सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी अद्यात वाहनाचा व चालकाचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करून अपघात घडल्यात ठिकाणा पासून चारही दिशेकडे शोध घेण्यास सुरुवात केली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगड, राहुल लाड, भारत भोसले, ज्ञानेश्वर राऊत, पोलीस आमदार आप्पा कड संतोष मोरे सचिन जतकर प्रवीण केंद्रे शेखर भोयर योगेश भंडारी यांनी पुणे नाशिकरोड वरील फुटेज व बातमी दारांच्या आधारे महाग काढून आरोपी कानिफनाथ कड याचा शोध घेतला.आरोपी हेद्रुज याठिकाणी आपले नातेवाईक देविदास पाटील व बच्चे यांच्या घराच्या जवळ गाडी लावून बसला असल्याचे समजले. अपघात ग्रस्त वाहन व चालक यांना त्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेण्यात आले.
माननीय मनोहर गोरगल्ले पुणे जिल्हा प्रतिनिधी
संपादक लहु लांडे