
आळेफाटा पोलीसांची कामगीरी
दिनांक १९/०२/२०२३ रोजी शिवजयंती असल्याने त्यानिमीत्त मा. पोलीस अधिक्षक श्री. अंकीत गोयल यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यास्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता अवैधपणे अग्निशस्त्र बाळगणारे लोकांवर लक्ष ठेवुन त्याबाबत योग्य ती कायदेशिर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या त्यानुसार आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत मौजे आळेफाटा येथे दिनांक १५/०२/२०२३ रोजी सायंकाळी ५/०० वा. चे सुमारास सपोनि श्री. सुनिल बडगुजर तसेच सहायक फौजदार डुंबरे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक लाल रंगाची पॅशन प्लस मोटारसायकल नं. एम.एच. १२ / ई. जे / ४९६३ या मोटारसायकलवर दोन इसम हे त्यांचेजवळ अवैधरित्या एक पिस्टल बाळगुन तो विक्री करण्याचे उद्देशाने आळेफाटा परीसरात फिरत आहेत. अशी गोपनिय बातमी मिळाल्याने सपोनि श्री. सुनिल बडगुजर यांनी याबाबत प्रभारी अधिकारी यशवंत नलावडे यांना माहीती देवुन पोलीस स्टेशनला हजर असलेले स.फौ. चंद्रशेखर डुंबरे, पो. हवा. भिमा लोंढे, पो. हवा. विनोद गायकवाड, पो.ना.पंकज पारखे, पो.कॉ. अमित मालुंजे, पो.कॉ. नवीन अरगडे असे आळेफाटा बसस्टॅंड परीसरामध्ये मिळाले बातमीचे अनुशंगाने खाजगी वाहनाने रवाना झाले होते.
मिळालेल्या बातमीप्रमाणे व वर्णनाप्रमाणे आळेफाटा परीसरामध्ये पोलीस स्टाफने पंचांसह सापळा लावला असता एक लाल रंगाची पेंशन प्लस मोटारसायकल नं. एम.एच.१२/ ई. जे / ४९६३ हि मोटारसायकल नगर कल्याण हायवे रोडवर आली असता तिस येवले चहाचे दुकानाचे जवळ थांबवुन त्यावरील दोन इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे १) प्रविण यमनाजी निचीत वय ४५ वर्षे रा. वडनेर खुर्द ता. शिरूर जि. पुणे १२) सुरेश अरुमुगम मुपनार वय ३८ वर्षे मुळ रा. रूम नं. ३ सय्यद अली चाळ नित्यानंदनगर घाटकोपर वेस्ट मुंबई सध्या रा. पिंपरी पेंढार आस्वाद हाम्टेलचे समोर ता. जुन्नर जि.पुणे असे असल्याचे सांगीतले त्यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता प्रविण यमनाजी निचीत वय ४५ वर्षे रा. वडनेर खुर्द ता. शिरूर जि. पुणे याचे कमरेस एक गावठी कट्टा ( पिस्टल ) मॅगझिनसह व एक मोटारसायकल तसेच सुरेश अरुमुगम मुपनार वय ३८ वर्षे मुळ रा. रूम नं. ३ सय्यद अली चाळ नित्यानंदनगर घाटकोपर वेस्ट मुंबई सध्या रा. पिंपरी पेंढार आस्वाद हाम्टेलचे समोर ता. जुन्नर जि.पुणे याचे ताब्यातुन २ जिवंत काडतुस मिळुन आले त्यावेळी सदरचे अग्निशस्त्रा बाबत त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे देवुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता सदरचे अग्निशस्त्र हे विक्री करण्यासाठी आळेफाटा येथे घेवुन आलो असलेबाबत सांगीतले आहे.
संशयित इसमांना पोलीस स्टेशनला आणुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता यातील प्रविण यमनाजी निचित याचेवर यापुर्वी भा.द.वि. कलम ३०२, ३९५, ३२६ यासारखे गंभीर गुन्हे दाखल असुन सुरेश अरुमुगम मुपनार वय ३८ वर्षे मुळ रा. रूम नं. ३ सय्यद अली चाळ नित्यानंदनगर घाटकोपर वेस्ट मुंबई सध्या रा. पिंपरी पेंढार आस्वाद हॉटेलचे समोर ता. जुन्नर जि. पुणे यावेबाबत माहीती घेण्याचे काम सुरू आहे.
सदर वरील इसमांकडे मिळालेल्या अग्निशस्त्रामुळे त्यांचेवर आळेफाटा पोलीस स्टेशन गु र नं. ६० / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच त्यांचेकडे अजुन काही अग्निशस्त्रे आहेत का याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी हि मा. श्री अंकीत गोयल सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. मितेश घट्टे सो अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, मा. मंदार जवळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. यशवंत नलावडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, सहायक फौजदार चंद्रशेखर डुंबरे, पो. हवा. विनोद गायकवाड, पो. हवा. भिमा लोंढे, पो. हवा. लहानु बांगर, पो.ना. पंकज पारखे, पो. कॉ. अमित मालुंजे, पो. कॉ. नवीन अरगडे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर हे करीत आहेत.
पोलीस निरीक्षक आळेफाटा पोलीस स्टेशन