
स्नेहसंमेलन उत्साहात *
पोदार इंटरनॅशनल स्कूल, रोहकलचा प्रथम वार्षिक
स्नेहसंमेलन सोहळा गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२३
रोजी शाळेच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषात पार पडला.
साहित्यातील “नवरस” या संकल्पनेवर आधारित विविध
नेत्रदीपक नृत्याविष्कार तसेच नाट्य सादर करून
बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवर व पालक यांना
मंत्रमुग्ध करत नवरसाच्या खऱ्या संकल्पनेचे दर्शन
घडवले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुनील
बल्लाळ (मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद),
मा. डी. एस. जे. फ्रँकलिन (जनरल मॅनेजर- पोदार
एज्युकेशन नेटवर्क, पुणे जिल्हा), पुणे आणि
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोदार इंटरनॅशनल
स्कूलच्या सर्व शाखांचे प्राचार्य तसेच शाळेच्या उप
प्राचार्या सौ. शीतल जैसवारा आणि सर्व शिक्षक उपस्थित
होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. सुनील बल्लाळ यांनी
शाळेची वाढती व्याप्ती आणि विकास यावर मनोगत
व्यक्त केले.
रस हे मनाची भावनिक स्थिति तसेच भावनांचे अभ्यास
करणारे शास्त्र आहे असे सांगत सर्व शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ
म्हणून आजचे हे अतिशय सुंदर असे सादरीकरण
आपणास पहावयास मिळत आहेत असे शाळेचे प्राचार्य
एस. के. भारद्वाज सर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त
केले. तसेच विद्यार्थी सिद्धांत गुगलिया आणि शिक्षिका
सौ. पूजा कदम यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर
केला.
गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा
गौरव प्राचार्य व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पुरस्कार
देऊन करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन केले. कार्यक्रम नियोजिका सौ. अर्चना
वाळुंज यांनी सर्व उपस्थित मान्यवर व पालक यांचे
आभार मानले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य पालक
आवर्जून उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता
झाली.
प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता