

भामचंद्र डोंगरावर शिवलिंगाच्या दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या निमित्त फराळ वाटप करण्यात आला. भामचंद्र डोंगराच्या पंचक्रोशीतील भामचंद्र डोंगरावरती शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते हर हर महादेव जय भोलेनाथ अशा वेगवेगळ्या गजरात महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले यावेळी भाविक भक्तांनी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी उंच डोंगराची चढण चढत शिवलिंगाचे दर्शन घेतले यावेळी वासुली येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख अमोल पाचपुते यांनी स्वर्गीय काळूराम अण्णा प्रतिष्ठानच्या वतीने पाचपुते कुटुंबियांनी पहाटे अभिषेक व पुजा केली तसेच भाविक भक्तांना उपवासाच्या निमित्ताने केळी व खिचडी वाटप करण्यात आली. भीमाशंकर प्रमाणे भामचंद्र डोंगरावर महादेवाचे पुरातन असे शिवलिंग आहे येथे शिवरात्रीला व श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. वासुलीचे युवा उद्योजक चेतन पाचपुते उद्योजक रामेश्वर पारखे, शेलु गावचे उद्योजक सुखदेव शेठ पडवळ, शिंदे गावचे सामाजिक कार्यकर्ते युवराज पानमंद, बोरदरा गावचे युवा उद्योजक सौरभ दादा गायकवाड ,आकाश साखरे,मोरे महाराज ,डॉक्टर कपिल देशमुख ,दादा पांढरे ,गणेश कालकेश्वर, हर्षद पारखे ,दत्ता पारखे ,रोहित दुधगुळे, बाळू पाचपुते आदींनी भाविक भक्तांची व्यवस्था केली.
धन्यवाद…
अस्सल न्युज महाराष्ट्र करीता,
प्रतिनिधी
-विकास जांभुळकर