


आमचं चाकण , कचरामुक्त चाकण ,निरोगी चाकण
_या अभियानाअंतर्गत नगर परिषद चाकण मुख्याधिकारी *श्री सुनील बल्लाळ सर* यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण शहरात सायकल रॅली आणि ई बाईक चे आयोजन करण्यात आले होते_ शिवाजी विद्यालय चाकण या शाळेचे सर्व विद्यार्थ्यांनी नगर परिषद कर्मचारी आणि शहरातील नागरिक या सर्वांनी सायकल रॅली मध्ये सहभाग नोंदवला होता तेव्हा मुख्याधिकारी सुनील बल्लाळ सर यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखूउन रॅली ची सुरुवात करण्यात आली पर्यावरणाचा वाढता ऱ्हास थांबवण्यासाठी सर्वांनी सायकल आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर करावा हा संदेश देण्यात आला. *नगरपरिषद मुख्याधिकारी बल्लाळ सर यांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले की प्रत्येकाने आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी इंधन वर चालणाऱ्या वाहनांचा वापर टाळावा ई वाहनाचा वापर शक्य होईल तेवढ्या जास्त प्रमाणात वापर करावा इलेक्ट्रॉनिक बाईक वापरणे किव्हा सायकल व पायी चालावे जेणेकरून आरोग्य चांगले राहील आणि पर्यावरण प्रदूषण होणार नाही असा संदेश दिला आहे.* यावेळी उपमुख्याधिकारी राजेंद्र पांढरपट्टे सर , नगर परिषद अधिकारी , कर्मचारी आणि कारपे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता