चाकण एमआयडीसीतील कंपनीत रात्रीच्या वेळी पडलेल्या दरोडयाची चाकण पोलीसांकडुन उकल, पाच आरोपींना अटक, ३,३६,३००/- रूपयांचा मुददेमाल जप्त

Spread the love
चाकण एमआयडीसीतील कंपनीत रात्रीच्या वेळी पडलेल्या दरोडयाची चाकण पोलीसांकडुन उकल, पाच आरोपींना अटक, ३,३६,३००/- रूपयांचा मुददेमाल जप्त
दिनांक १७/०२ / २०२३ रोजी फिर्यादी गोरक्षनाथ गोविंद गायकवाड, वय ३६ धंदा नोकरी, रा. कुरूळी ता. खेड जि. पुणे यांनी चाकण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की, दिनांक १७/०२/२०२३ रोजी पहाटे ०२/०० वा. चे सुमारास चाकण येथील दावड मळयातील टेक्नोड्राय सिस्टम इंजिनिअरींग प्रा. लि. या कंपनीमध्ये पाच ते सहा अनोळखी इसमांनी कंपनीत प्रवेश करून कंपनीतील सिक्युरीटी गार्ड दिलनवाज मोहंमद खान याला धमकी देवुन चाकुचा धाक दाखवुन तसेच दुसरा सिक्युरीटी गार्ड नामदेव मरिबा भोगे याला लोखंडी रॉडने मारण्याची धमकी देवून त्याचे हातपाय दोरीने बांधुन कंपनीतील स्टेनलेस स्टिल व माईल्ड स्टिल एकुण ८०० किलो स्क्रॅप सुमारे ९१,३००/- रू. किंमतीचा मुददेमाल छोटा हत्ती टॅम्पो मध्ये भरून दरोडा टाकुन चोरून नेलेला आहे अशी तक्रार दिली सदर तक्रारी वरून चाकण पोलीस स्टेशन गुरनं २२४ / २०२३ भादवि कलम ३९५ प्रमाणे पाच ते सहा अज्ञात आरोपी यांचे विरोधात गुन्हा दाखल केलेला होता.
सदर गुन्हयाचे गांर्भिय लक्षात घेवुन चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वैभव शिंगारे यांनी चाकण पोलीस स्टेशन कडील डि. बी. पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले. तसेच अनिल देवडे, पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी व डि. बी. पथकाने सदर कंपनीतील सिक्युरीटी गार्ड यांचेकडे चौकशी सुरू केली. कंपनीतील सीसीटीव्ही तपासातुन त्यामध्ये समोर आलेल्या बाबी तसेच कंपनीतील सिक्युरीटी गार्ड दिलनवाज खान याचेकडे चौकशी करत असतांना तो सांगत असलेल्या माहितीमध्ये वारंवार तफावत असल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने व त्याचे सहकारी अन्वर अली, मोहंमद हनिफ मोहंमद शफी शेख, रिझवान अहमद अबुसामा चौधरी, जसरूददीन वसीउददीन चौधरी, दिपक युवरा सुरवाडे, सर्व रा. शिळफाटा, मुंब्रा ठाणे यांना शिळफाटा मुंब्रा ठाणे यांचेसोबत मिळुन नियोजनबध्द कट रचुन सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी १) दिलनवाज मोहंमद शफी खान वय ५४ रा. दावडमळा चाकण ता खेड जि पुणे यास सदर गुन्हयात अटक केली, त्यानंतर चाकण पो स्टे कडील डि. बी. पथकाने आरोपी नामे २) मोहंमद हनिफ मोहंमद शफी शेख, वय ३२ वर्षे, ३) रिझवान अहमद अबुसामा चौधरी, वय २२ वर्षे, ४) जसरूददीन वसीउददीन चौधरी, वय २३ वर्षे, ५) दिपक युवरा सुरवाडे, वय २३ वर्षे, सर्व रा. शिळफाटा, मुंब्रा ठाणे यांना शिळफाटा, मुंब्रा, ठाणे येथुन शिताफिने ताब्यात घेवुन सदर गुन्हयात अटक केलेली आहे. अटक आरोपींकडुन गुन्हयातील चोरी केलेला स्टेनलेस स्टिल व माईल्ड स्टिल एकुण ८०० किलो स्क्रॅप सुमारे ९१,३०० /- रु. किंमतीचा गुन्हयातील चोरी गेलेला सर्व मुददेमाल तसेच गुन्हयात वापरलेली छोटा हत्ती टॅम्पो नं एम एच ०३ सी व्हि ४३२६ ही व आरोपींचे गुन्हयात वापरलेले मोबाईल फोन असा एकुण ३,३६,३००/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त केलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसंन्न जराड, विक्रम गायकवाड, सुरेश हिंगे, पो हवा राजु जाधव, संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, निखिल शेटे, भैरोबा यादव, मपोना भाग्यश्री जमदाडे, पोकॉ / नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि विक्रम गायकवाड हे करीत आहेत.
(विवेक पाटील
पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, पिंपरी चिंचवड

प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents