काळेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था निवडणूक बिनविरोध, २९ वर्षाची परंपरा अबाधित ठेवली..!

Spread the love
काळेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था निवडणूक बिनविरोध, २९ वर्षाची परंपरा अबाधित ठेवली..!
चाकण : काळूस गावचे भूषण म्हणून नावारूपाला आलेल्या काळेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची सन २०२३ ते २०२८ ची संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध पार पडली. या पतसंस्थेच्या स्थापणे पासूनच्या इतिहासात २९ वर्षे सलग बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली. या संस्थेचा कारभारही स्वच्छ असल्याने सगळं इतके वर्षे बिनविरोध प्रक्रिया पार पडत आहे.
या निवडणुकीत एकूण २६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील एकूण १५ उमेदवारांनी माघार घेतली तर ११ उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव महादु अरगडे आजी. पंचायत समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माजी उपसभापती ज्योती अरगडे यांच्या यशस्वी शिष्टाईने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे शिवसेना नेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, पुणे जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, खेड तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र जवळेकर, चाकण शिवसेना शहर प्रमुख अक्षय जाधव, शिवसेनेचे नेते प्रकाश वाडेकर, अशोक भूजबळ, दत्ता राऊत, धनंजय पठारे मान्यवराणी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ –
१) जाचक पवन फक्कड- सर्वसाधारण
२) टेमगिरे गोरक्ष रामचंद्र- सर्वसाधारण
३) खैरे राहुल दत्तात्रय- सर्वसाधारण
४) खैरे भरत तुकाराम- सर्वसाधारण
५) पोटवडे विश्वनाथ तुकाराम-सर्वसाधारण
६) गायकवाड विकास बबनराव- सर्वसाधारण
७) हटाळे दिनेश भाऊसाहेब- अनुसूचीत जाती/जमाती
८) पोटवडे विजया श्रीकांत- महिला प्रतिंनिधी
९) सांडभोर रेखा विकास- महिला प्रतिंनिधी
१०) अरगडे केशव बबनराव- इतर मागासवर्गीय प्रतिंनिधी
११) राठोड अनिल सुभाष – भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग
माघार घेतलेले उमेदवार-
१) बोराडे ईश्वर तुकाराम- अनुसूचीत जाती/जमाती
२) अरगडे शिल्पा सूर्यकांत
३) खैरे राधिका भरत
४) अरगडे केशव बबनराव
५) गायकवाड विकास बबनराव
६) कोळेकर लहू बाळासाहेब
७) पोटवडे वैभव विश्वनाथ
८) पोटवडे संदीप भरत
९) पोटवडे संदीप दत्तात्रय
१०) अरगडे गणपत ज्ञांनेश्वर
११) पवळे अनिल अशोक
१२) पवळे दत्तात्रय खंडेराव
१३) पोटवडे प्रकाश निवृत्ती
१४) खैरे भगवान रंगनाथ
१५) जाचक पवन फक्कड
काळेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी संस्थेच्या सचिव मंगलताई भनगडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents