

रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व अॅड.राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालय ,वाडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रथमतः डाॅ.सी.व्ही. रामण यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले यानंतर प्राचार्य शिवाजीराव दुंडे यांनी विज्ञानातील संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगितल्या त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन कशाप्रकारे निर्माण करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांत असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे फलित असून सी व्ही रमण यांना अभिवादन आहे आणि भारत एक महाशक्ती व्हावा आणि भविष्यातील वैज्ञानिक घडामोडी मध्ये भारत जगात अग्रगण्य असावा असे विधान यावेळेस त्यांनी केले यानंतर विद्यार्थ्यांना विज्ञान साहित्याचा परिचय व्हावा त्यासाठी इयत्ता पाचवी पासूनचे विद्यार्थी यांच्यासाठी प्रयोगशाळा खुली करण्यात आली त्याचबरोबर प्रयोगशाळेतील साहित्य व्यवस्थित रित्या मांडून त्याच्याबद्दल माहिती देण्यात आली यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी प्रयोग शाळेतील साहित्याचे निरीक्षण करून माहीती विज्ञान विभाग प्रमुख प्रतिभा कडलग,इम्रान मुलाणी यांनी विद्यार्थ्यांना समजून सागीतली या प्रसंगी पर्यवेक्षक नामदेव डोके,रत्नप्रभा शितोळे,दिलीप बच्चे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते
प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता