कै. भागूबाई पिंगळे कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान अंतर्गत तरुणीवर होणाऱ्या अन्याय , छेड छेडी सारख्या प्रकारांपासून स्वतःचा बचाव कसा करावा यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम कसे करावे यावर मार्गदर्शन पर व्याख्यानांचे आयोजन दिनांक 28/2/2023 रोजी करण्यात आले होते .या कार्यक्रम साठी प्रमुख पाहुणे म्हणून चाकण पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती.वैशाली खंडागळे मॅडम, श्रीमती.अर्चना हाडवळे मॅडम , तसेच कराटे प्रशिक्षक श्रीमती मीनल भोसले मॅडम, श्री शाहू महाविद्यालय, पुणे माजी प्राचार्य डॉ. शोभा इंगवले मॅडम आदी उपस्थित होते. कार्यक्रमच्या सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.धनश्री आवटे , मनीष शिंदे, चेतन पाटील यांनी मुलींना एखाद्या कठिन परिस्थितित स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे काही सोप्या शारीरिक कौशल्याच्या प्रात्यक्षिक सादर केले. प्रमुख पाहूणे पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती वैशाली खंडागळे यांनी आजच्या काळात समाज माध्यमामुळे मुलींची कशा प्रकारे फसवणूक केली जाते याची काही उदाहरणे देऊन अशा अडचणी वेळी काय उपाय करावे याची माहिती दिली. पोलिस कोन्सस्टेबलअर्चना हाडवळे मॅडम यांनी मुलींनी स्वतः सक्षम् बनून निर्भयतेने जीवन जगले पाहिजे असा संदेश दिला. कार्यक्रमच्या अध्यक्ष डॉ शोभा इंगावले मॅडम यांनी आजची मुलीने बचावासाठी कोनावरही अवलंबुन न राहता स्वतःचे रक्षण करण्याचे प्रशिक्षण ही आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले. आजही बऱ्याच मुलीं या समाजमध्ये दररोज अनुचित घटनांना बळी पड़त असुन त्या दड़पनाखाली जीवन जगत आहेत. त्यांना निर्भय बनून स्वतंत्रपणे जीवन जगता आले पाहिजे असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यलायचे प्राचार्य श्री संतोष बुट्टे यांनी प्रास्ताविक करताना महाविद्यालयात मुलीसाठी असणाऱ्या सोय सुविधा याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. जावेद तांबोळी सर यांनी केले कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्रा.भरत सर,प्रा.राम् सर प्रा. गणेश शिंदे सर. प्रा. रोहिणी सोनावणे ,प्रा. अनुजा कोऱ्हाळे प्रा.पूजा जैद उपस्थित होते . कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.केतन जैद यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता