
शिक्रापूर : शिक्रापूर स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमीच्या वेगवेगळ्या कारवाया करून व चर्चेत येत असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील एका पोलीस कर्मचाऱ्यांचे समाजसेवा दिसून आले
पोलिसांनी यापूर्वी अनेकदा अपघातग्रस्तांना मदतीचा हात देण्यात रस्त्यावर खड्डे बुजाने शाळा करून मुलांना मदत करणे गरजेचे अन्न पाण्याची सुविधा करणे आधी उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवलेल्या असताना अपघातग्रस्त आणि वेळेच मदत मिळवण्यासाठी अपघात मदतीसाठी स्वतंत्र पोलिसाची नेमणूक केली आहे . शिक्रापूर येथे वाहतूक नियमाचे काम करणारे पोलीस कर्मचारी अंबादास थोरे हे आपले वाहतूक नियमांचे कर्तव्य बजावत असताना चौकात रस्ता वळणाऱ्या अंध अपंग नागरिकांसह,ज्येष्ठ नागरिक,व लहान शाळकरी मुलांना,हाताला पकडून रस्ता ओलांडून देत माणुसकीचे दर्शन घडवत आहे.
याबाबत बोलताना मानव सेवा हीच ईश्वरसेवा असे समजून आपण हे कार्य करत असल्याचे पोलीस शिपाई अंबादास थोरे यांनी सांगितले.
कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/ 7350559916