
कारेगाव ता. शिरूर : रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कारेगाव येथे इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर तलवार सह फोटो टाकून दहशत निर्माण करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नामदेव खुशाल कल्लाळे व रुद्रा विठ्ठल रोकडे असे दोघा युवकांची नावे आहे.
सदर हे दोघे युवक कारेगाव येथे इंस्टाग्राम या सोशल मीडियावर धारदार तलवार हातात घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांना मिळाली.
त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे,हवालदार विलास आंबेकर,शिपाई उमेश कुतवळ, आम्ही सदर त्या युवकांचा तपास करीत त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस करुन दोघांच्या घरातुन दोन तलवार ताब्यात घेतल्या. याबाबत याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खरेदी दिले असल्याने पोलिसांनी नामदेव कल्लाळे वय 22,रा.कारेगाव ता. शिरूर व रुद्रा विठ्ठल रोकडे वय 24, रा.कारेगाव ता. शिरूर, मुळ. मुकुंदवाडी जि. छत्रपती संभाजी नगर असुन सदर त्यांना अटक करण्यात आली आहे व त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप जगदाळे व गणेश आगलावे हे करीत आहे.
कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432 / 7350559916