भामा आसखेड धरण प्रकल्पमधील खालील मागण्या मान्य करणे बाबत.

Spread the love
विषय :- भामा आसखेड धरण प्रकल्पमधील खालील मागण्या मान्य करणे बाबत.
१)खेड तालुक्यातील नाणेकरवाडी , चाकण, गोणवडी, कडाचीवाडी,रासे,भोसे, खराबवाडी, काळूस, मेदनकरवाडी येथील जागा कालव्याद्वारे पाणी देणार म्हणून संपादित केल्या परंतु तिथे आजपर्यंत पाण्याचा एक थेंब सुद्धा मिळाला नाही. तेथील शेतकऱ्यांनी पाणी नाही तर जागा नाही असा पवित्रा घेतला असून. तेथील शेतकऱ्यांनी ताबा दिला नसून त्या सर्व जागा कलम ४८(१) नुसार शासनाने त्वरित पुन्हा मूळ शेतकऱ्याच्या नावे करण्यात याव्यात.
२)ज्या शेतकऱ्यांनी ताबा दिला आहे त्यांना नवीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार ४-५ पटीने पैसे देण्यात याव्यात.
३)खेड तालुक्यातील १८ गावांपैकी नाणेकरवाडी , चाकण, गोणवडी, कडाचीवाडी,रासे,भोसे, खराबवाडी, काळूस, मेदनकरवाडी,यांचे हक्काचे पाणी भामा आसखेड असखेड धरणाचे संपूर्ण पाणी हे बिगर सिंचनासाठी पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिका यांना पिण्यासाठी आरक्षित केल्याने सदर गावांना पाणी शिल्लक नसल्याने कालवा नको व कालव्याचे पाणी नको असे ग्रामपंचायत ,ग्रामसभेचे ठराव दिले ( नाणेकरवाडी , गोनवडी, कडाची वाडी,चाकण, काळुस , रासे , भोसे.) ह्या प्रस्तावावरती कृष्णा खोरे महामंडळाने कालवा व त्या कालव्याचे लाभक्षेत्र रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून कालवा व लाभक्षेत्र रद्द करन्याचा प्रत्साव शासनाकडे प्रलंबित आहे. तो प्रत्साव मान्य करून संपादित क्षेत्र व वाटप क्षेत्र मुळ मालकांच्या नवे करण्यात यावे.
४)कार्यकरी अभियंता म.कु.खो.वी.म.पुणे ११ यांच्या पत्रानुसार भामा असखेड धारणामध्ये १८८.६११ द.ल.घ.मी.पाणी यापैकी फक्त ९.७८ द.ल.घ.मी.एवढे आत्यल्प पाणी धारणामध्ये शिल्लक असून एवढे आत्यल्प पाणी १८८५ हे. क्षेत्र ओलिताखलि येऊ शकते परंतु खेड तालुक्यातील १८ गावातील एकूण ३४६५ हे.क्षेत्र सलग नसल्याने त्यांना कालव्याद्वारे पाणी देणे तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही त्यामुळे ३४६५ हे.क्षेत्र लाभक्षेत्रातून वगळावे. तसा प्रस्ताव (ईमेल द्वारे जा.क्र.मकृखोविम ४०/(२१२/२०१६)उअ – २/४७७/२०२२ दिनांक २२/०१/२०२२). शासनास सादर आहे. प्रत्साव तत्काळ मान्य करण्यात यावा.
४) दलाल यांनी काही भ्रष्ट अधिकारी यांना हाताला धरून बोगस कागदपत्रे सादर करून जागा घेतल्या. तरी पूर्ण प्रकल्पाची चौकशी करण्यात यावी.
५)कालवा रद्द चा प्रत्सावं(अ)(महाराष्ट्र कृष्ण खोरे विकास महामंडळ, पुणे -११ नियामक मंडळाची ९५ वी बैठक दिनांक १९ जून २०१७ ) भामा आसखेड उजवा कालवा रद्द ला तत्काळ मान्यता देण्यात यावी. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी पाण्याच्या बदल्यात कोरोडो रुपये दिले आहेत.

प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents