राजगुरुनगर वाहतूक विभागाची नो पार्किंग मधील वाहनांवरती धडक कारवाई*

Spread the love
राजगुरुनगर वाहतूक विभागाची नो पार्किंग मधील वाहनांवरती धडक कारवाई
उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण साहेबांच्या सूचनेनुसार राजगुरुनगर येथील नगरपरिषद, खेड न्यायालयात, उपविभागीय अधिकारी ऑफिस, तहसीलदार, डी वाय एस पी ऑफिस, पंचायत समिती, बाजार पेठ व इतर अनेक ठिकाणी बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली.
उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार काल २८/२/२०२३ रोजी खेड वाहतूक विभागाने राजगुरुनगर शहरांमध्ये स्टिकर लावून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज रोजी डीवायएसपी सुदर्शन पाटील साहेब व पीआय राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बबन भवारी, पोलीस हवालदार भाऊसाहेब कोरके, संतोष शिंदे, सोमनाथ गव्हाणे, विशाल कोठावळे, संजय पावडे ,संतोष जाधव, व मोमीन यांनी ही कारवाई केली.
राजगुरुनगर शहरात कायमच बेशिस्त पार्किंग करताना नागरीक दिसत होते.त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब व उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या आदेशाने राजगुरुनगर शहरात नो पार्किंग झोन मध्ये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १३० वाहनांवरती कारवाई करण्यात आली असून त्यातून ५४५००रुपयाचा दंड आकारण्यात आला. यापुढे अशी कारवाई चालू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नरे यांनी सांगितले
माननीय मनोहर गोरगल्ले कार्यकारी संपादक

प्रतिनिधी संपादक लहु लांडे अस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents