

शासकीय माध्य.व उच्च माध्य.आश्रमशाळा गोहे बुद्रुक येथील इयत्ता दहावीच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ.जोगदंड सर हे होते तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रफुल्ल लोखंडे साहेब
(गटविकास अधिकारी-जालना) व मा.राजू किर्वे साहेब
(सहाय्यक निबंधक)
हे लाभले.स्वागत सत्कारानंतर कार्यक्रमाचे प्रस्तावीक श्री.वाघुले सर यांनी केले.विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील मागील गोष्टींना उजाळा दिला. प्रमुख पाहुण्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य डॉ.जोगदंड सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन वर्गशिक्षक श्री.रावते यांनी केले.व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मदगे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्राध्यापक डुकरे सर यांनी केले.
प्रतिनिधी -डॉ.ओव्हाळ सर