

आज शुक्रवार दिनांक ३ मार्च २०२३ रोजी नवोन्मेष विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय चाकण याठिकाणी जुन्नर वनविभाग व वनपरिक्षेत्र चाकण तर्फे वन्यजीव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वन्यजीव महत्त्व व त्यांचे संवर्धन याविषयी माहिती देण्यात आली तसेच या निमित्ताने ललिता मोतीलालजी सांकला फौंडेशन(LMS) चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.मोतीलालजी सांकला व त्यांच्या कन्या सौ.वैशाली ओसवाल (सांकला) यांच्या संयुक्त विद्यमाने वन्य विभागाला वणवा क्षमन साहित्य,आग प्रतिरोधक बूट व हॅण्ड ग्लोज इत्यादी सुमारे दीड लाख रुपये किमतीचे साहित्य आज वन्यजीव दिनी देण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना बिरदवडे ,ज्यू.कॉलेज च्या प्राचार्या सौ.शिल्पा पिंगळे,शाळेचे व्यवस्थापक मा.श्री.बाळासाहेब गवळी व शिक्षकवृंद उपस्थित होते.याप्रसंगी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मा.श्री.योगेश महाजन यांच्या नियोजनाखाली सौ.योगिता वीर (नायकवाडी) यांनी मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित वनपाल सचिन जाधवर ,आरुडे भाऊसाहेब ,दिपाली रावते, सुवर्णा जगताप,कान्हे मॅडम,पाटोळे भाऊसाहेब ,चव्हाण भाऊसाहेब ,व त्याच बरोबर चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीम चे राहुल देशमुख ,रावसाहेब ढेरेंगे,प्रफुल्ल टंकसाळे, व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोनाली उमवणे ,व आभार रुपाली पवार यांनी मानले.
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर