

6 मार्च 2023 रोजी खेड तालुक्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्र व 45 पेक्षा अधिक आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांमध्ये प्रधानमंत्री भारतीय जन औषधि परियोजना (PMBJP) दिवस साजरा करण्यात आला यामध्ये कार्यक्षेत्रातील रक्तदाब व मधुमेह च्या रुग्णांना नियमित औषधे घेण्याचे फायदे सांगण्यात आले तसेच औषधींचे वाटप करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील जेनेरिक औषधी केंद्राची माहिती रुग्णांना देण्यात आली.
तसेच जेनेरिक औषधी “सस्ती भी अच्छी भी” हे घोषवाक्य 2023 च्या या कार्यक्रमात वापरण्यात आले.
यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत मधील सरपंच, जन आरोग्य समितीचे सदस्य यांचा सहभाग घेण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी वृंदाणे रुग्णहितासाठी हा कार्यक्रम उत्साहाने पार पाडला.
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर