महाराष्ट्र नवनिर्माण सेना
प्रति,
दिनांक :- ६/३/२०२३
मा. दुर्वास सो
जिल्हा सह. आयुक्त,
नगरपालिका, प्रशासन शाखा,
जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेशनरोड,
पुणे ४११००१-
विषय : राजगुरुनगर नगरपरिषदेची आर्थिक भष्टाचार व कामकाजाची चौकशी करणे बाबत.
अर्जदार : श्री. सोपान शंकर डुंबरे

Spread the love
महोदय,
वरिल विषयान्वे विनंती पुर्वक तक्रार अर्ज सादर करतो की, सदरच्या नगर परिषदेत सदयस्थितीत कायमस्वरुपी सी.ओ. नसल्यामुळे नगरपरिषदेचा तात्पुरता चार्ज हा मा. सुनील बल्लाळ साहेब चाकण नगरपरिषद यांच्याकडे आहे.
सदरच्या नगरपरिषदेकडुन संशयास्पद कर वसुली काही एनंट लोकांमार्फत चालु आहे. असे निदर्शनास येत आहे. काही लोक घरोघरी जावुन कर वसुली पावत्या देत आहेत. त्या पावत्यांवर कुठल्याही प्रकारचा शिक्का अथवा संबंधीत अधिकारी यांची सही नाही. सदरच्या आलेल्या व्यक्तीकडे नगरपरिषदेचे ओळखपत्र किंवा ड्रेसकोड नाही. एक पुस्तक हातामध्ये घेवुन घरोघरी जाउन पावत्या वाटत आहेत. व पैशांची मागणी असलेली कर पावती देत आहेत.
सदरच्या काही पावत्या हया पैसे भरलेल्या असतानाही चार ते पाच वर्षांची थकीत येणे बाकी
दाखवत आहेत. असे शेरे मारुन खोटी पैशाची मागणी करत आहेत. असे निदर्शनास आले आहे. सदर नागरिकांना सदनीकेचा सर्व भरणा केलेल्या पावत्या त्या नागरिकांकडे उपलब्ध आहेत. परंतु भरलेल्या भरणा पावत्यांची नोंद नगरपरिषदेकडे खतावलेली दिसत नाही. त्यामुळे सदरच्या मागणी पावतीवर संशय निर्माण होत आहे.
सन २०१९ साली विकलेल्या सदनिकेचे नोंद नगरपरिषद दप्तरी झाली असताना व सदरच्या नविन फ्लॅट धारकांकडुन कर भरणा केला आहे. तसा इंडेक्स पण झाला आहे. कर पावती भरली आहे. तरीसुध्दा पाच वर्षानंतरही जुन्याच मालकाच्या नावाने पावती देवुन वसुनीकेली जात आहे. मग नवीन सदनिका धारकाने भरलेली वर्गणी / कर / पाणीपट्टी /दिवाबत्ती भरलेला पैसा गेला कुठे ? या
सर्व व्यवहारांची कर वसुली पावत्यांची व नगर परिषदेतील आर्थिक व्यवहारांची त्वरित चौकशी व्हावी. अशी मागणी करत आहोत. व जर कोणी अधिकारी यामध्ये कामात हलगर्जी पणा करणे आर्थिक भ्रष्टाचार करणे व सदरच्या प्रकरणात कामात चुक करुन हलगर्जीपना झाल्यास सदरच्या अधिकारांवर कडक कारवाही करावी व त्याचा चौकशी अहवाल सादर व्हावा. हि विनंती.
अन्यथा या प्रकरणाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेड तालुका, राजरुनगर शहराच्यावतीने भव्य असे मनसे स्टाईलने जनअंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी व होणा-या अंदोलनाची संपुर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल.
धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents