
शिक्रापूर : येथील पाट वस्ती 3 दिवसापासून तोंडात प्लास्टिक ची बरणी अडकलेल्या अपंग कुत्र्याची सुटका करुन त्याला मुक्त केले.पाट वस्ती 3 दिवसापासून तोंडात प्लास्टिक ची बरणी अडकलेला एक अपंग कुत्रा फिरत होता. याबाबत ची माहिती निसर्ग वन्यजीव संस्थेचे संस्थापक अद्यक्ष श्री.शेरखान शेख यांना माहिती भेटताच, शेरखान शेख, सर्पमित्र अमोल कुसाळकर,पशुपक्षी चिकित्सक डॉ,नितीन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते, संतोष काळे, मोहन सासवडे, शुभम माने, विक्की मांढरे,सुजित विरोळे,यांसह आदिंनी धाव घेत मोठया शिताफिने सदर कुत्र्याला पकडून त्याच्या तोंडात अडकलेली बरणी काढुन घेतली. यावेळी डॉ. नितीन सोनवणे यांनी कुत्र्याची तपासणी करुन सदर तातडीने त्याला सोडुन दिले आहे.
3 दिवस बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका केल्या बद्दल श्री.शेरखान शेख व त्यांचे सहकार्य चे सर्वत्र आभार मानले जात आहे.
कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/7350559916