स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर स्वच्छता मोहीम

Spread the love
स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर स्वच्छता मोहीम
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची तपोभूमी काही पर्यटक असतील किंवा बाहेरून येणारे लोक असतील हा पवित्र परिसर त्या ठिकाणी प्लास्टिकच्या कचऱ्याच्या मार्फत खराब करण्याचा प्रयत्न केला श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगरावर भरपूर प्लास्टिकचा मध्याच्या बाटल्यांचा कचरा झालाय अशी माहिती स्वराज्य संघाचे अध्यक्ष विश्व विक्रमी कीर्तनकार बाजीराव महाराज बांगर यांना माणिक महाराज मोरे यांच्या माध्यमातून मिळाली लगेच तातडीचे नियोजन करून दोनच दिवसात या स्वच्छता मोहिमेचा नियोजन करण्यात आलं या मोहिमेचं नियोजन बाबासाहेब दिघे यांनी केलं अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर यांच्या नियोजनाखाली स्वराज्य संघाचे अनेक पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले आणि या मोहिमेमध्ये तब्बल 32 गोणी कचरा जमा करण्यात आला यामध्ये प्लास्टिक बॉटल चकण्याच्या प्लास्टिक रॅपर गुटखा तंबाखूच्या पुढ्या याशिवाय दोन गोणी दारूच्या बॉटल देखील जमा करण्यात आल्या स्वराज्य संघाच्या माध्यमातून सकाळी सहा ते दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत ही मोहीम यशस्वी करण्यात आली यामध्ये स्वराज्य संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य कार्याध्यक्ष माणिक महाराज मोरे उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे राज्य विस्तारक सचिन कारले सहसंघटक संतोष टाकळकर संपर्कप्रमुख दिलीपराव पवळे तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य अध्यात्मिक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुदाम सकपाळ जिल्हा शेतकरी आघाडी प्रमुख वनाजी बांगर तसेच शिरूर तालुका अध्यक्ष विशाल दिघे खेड तालुका उपाध्यक्ष संतोष टाकळकर खेड सह संपर्कप्रमुख रवी पडवळ नामदेव पडदूनेसर अनिल लिंबोरे संदीप साळुंखे गणपत काळे संतोष लोंढे सोमनाथ महाळुंगकर गणेश साळुंखे दिनेश साळुंखे किरण साळुंखे अमोल बोंबले विठ्ठल गवारी शौर्य पडवळ अमित वडगावकर दिनेश कुंभार तसेच खेड महिला संपर्कप्रमुख उर्मिला गवारी दिव्या दिघे सुगंधा पाचारणे इत्यादी महिला कार्यकर्त्या देखील उपस्थित होत्या या मोहिमेत आरती करून पसायदानाने मोहिमेचे सांगता करण्यात आली अशी माहिती स्वराज्य संघाचे राज्य संपर्कप्रमुख दिलीपराव पवळे यांनी दिली

प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents