चाकण नगर परिषद, टेनेको इंडिया प्रा ली व कारपे संस्था



चाकण नगर परिषद, टेनेको इंडिया प्रा ली व कारपे संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात आमचं चाकण कचरामुक्त चाकण निरोगी चाकण हे अभियान चालू आहे या अभियानांतर्गत व नगर परिषदेचे मुख्यधिकारी श्री सुनील बल्लाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला तसेच महिला दिनाचे औचित्य साधून स्वच्छता क्वीन हा कार्यक्रम घेण्यात आला.
सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते माता सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
चाकण शहराच्या स्वच्छता दूत ह. भ. प. ज्योती ताई गरुड यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत स्त्री सशक्तीकरण व पूर्वीच्या युगात चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री ही आपल्या इच्छाशक्ती कृतत्व याच्या जोरावर खूप पुढे आलेली आहे आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतंत्र पणे आपले आयुष्य जगत आहे. अशा खूप मार्मिक शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर स्वच्छता क्वीन स्पर्धा संपन्न झाली यामध्ये :-
प्रथम क्रमांक :- स्नेहल गोरे
द्वितीय क्रमांक :- शेवंता कदम
तृतीय क्रमांक :- लक्ष्मीबाई मंजुळे
यांनी पटकावला.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सुनील बल्लाळ , उपमुख्याधिकारी श्री पांढरपट्टे व आरोग्य प्रमुख श्रीमती कविता पाटील व श्रीमती कोमल माने यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
उपस्थित सर्व महिलांना विविध फुलांचे वृक्ष रोपटे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी नगर परिषदेचे सर्व महिला अधिकारी व कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, NDK महिला कर्मचारी , मा. प्रियाताई पवार आणि कारपे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर