


श्रीराम युवा प्रतिष्ठान कळमोडी ता – खेड यांच्या वतीने शिवजयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवजयंती निमित्त प्रा महेश रानवडे यांनी आपल्या व्याख्यानातून प्रबोधन केले. प्रत्येक गावात शिवचरित्राचे पारायण झाले पाहिजे तरच शिवविचार प्रत्येक मनात पोहचेल असे प्रतिपादन केले. शिवजयंती निमित्त व्याख्यानात प्रा रानवडे बोलत होते.या प्रसंगी श्रीराम सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना खाऊ व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. गावातील महिलांचे विविध खेळ घेऊन त्यांना पैठणीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्रीराम सेवा प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मच्छिन्द्र गोपाळे यांनी केले.
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर