

अँकर
महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील तीनही कंपन्यात कार्यरत कर्मचाऱ्यांची अग्रगण्य असणाऱ्या पतसंस्थेच्या सन 2023 ते 2028 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक पार पडली.चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सदर विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेवर श्री सिद्धेश्वर स्वाभिमानी सहकार विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. सदर पॅनल तांत्रिक कामगार 5059 अधिपत्याखाली लढला असून, विरोधी पॅनल श्री सिद्धिविनायक विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन यांचा 13/0 असा धुवा उडवला. तांत्रिक कामगार युनियन 5059 चे अध्यक्ष श्री दिलीपजी कोरडे, सरचिटणीस श्री प्रभाकर लहाने व उपसरचिटणीस श्री शिवाजी शिवनेचारी यांच्या अधिपत्याखाली लढलेल्या या निवडणुकीत विरोधी पॅनलच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे , श्री. शरद डगळे, शिवाजी शिवणेचारी,प्रविण घनवट, सूर्यकांत सांडभोर,संतोष लांडे ,विजय बनकर
,अजित दजगुडे ,राधाकृष्ण होंडे,
महेश पाटील , छाया मुंडे,सविता शिंदे , दत्तात्रय बुर्डे, सोळंके दिलीप. सदर पॅनलची प्रचाराची धुरा श्री विलास निमसटकर, चंद्रशेखर बधे, दीपक तनपुरे, सुरज मुलानी, सचिन कलढोणे, रंगनाथ गोरडे, महेंद्र विधाटे यांनी पार पाडली.
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर