शिंदे वासुली,दि.१५(वार्ताहर) – शिंदे केंद्रातील भामचंद्र नगर, वासुली (ता.खेड) येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.

Spread the love
शिंदे वासुली,दि.१५(वार्ताहर) – शिंदे केंद्रातील भामचंद्र नगर, वासुली (ता.खेड) येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.
चाकण औद्योगिकीकरणामुळे वासुली परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढले असल्याने भामचंद्रनगरच्या शाळेमध्ये मागील दोन वर्षांपासून विद्यार्थी संख्या सतत वाढत असून इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत सुमारे १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी पटसंख्या व चार वर्गाच्या मानाने शिक्षकांची कमतरता असुनही शाळेमध्ये कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका शितल बनसोडे आणि त्यांच्या सहकारी शिक्षिका प्रमिला झावरे, अर्चना मरभळ या तिन्ही शिक्षकांनी शैक्षणिक व्यापातून वेळ काढून केवळ १०-१२ दिवसांत विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी केली होती.
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने परिसरातील शैक्षणिक, राजकीय, व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील लर्निग ट्री इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सुनिता बुट्टे पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती मांडेकर, राजमाता जिजाऊ संस्थेच्या अध्यक्षा रत्ना पिंगळे देशमुख, सरपंच कोमल पाचपुते, सरपंच शितल पिंजण, सरपंच प्राची लिंभोरे, माजी सभापती कल्पना गवारी, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा मालिनी शिंदे, राजमाता जिजाऊ संस्था उपाध्यक्षा उषा पावडे यांचा सन्मान करण्यात आला.
सुमारे तीन तास चाललेल्या कार्यक्रमाध्ये सामुहिक नृत्य, समुहगान, एकांकिका अशा विविध प्रकारे विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. कार्यक्रमासाठी विश्वास बुट्टे पाटील, सुरेश पिंगळे, दिपक लिंभोरे, कुमार नवरे, अशोक गावडे, महाळूंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीयुत इचके, पोलीस नाईक ढमढेरे व सहकारी, आदी पाहुणे, शिंदे केंद्र प्रमुख तानाजी खैरे व अंकूश कोकणे, शिवाजी चौगुले या सहकारी शिक्षकांसह सआतवएकर सर, जगताप सर, बोरकर सर, मरभळ सर, सिकिलकर सर, वाटेकर सर, गावडे सर, निखाडे सर, डेरे सर, वाघमारे सर, १५० विद्यार्थ्यांचे पालक व स्थानिक असे सुमारे ५०० प्रेक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश घुले व सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ व स्थानिक युवकांनी केले होते. सुत्रसंचलन निवेदक विकास जांभूळकर यांनी केले तर समितीचे शिक्षणतज्ञ दत्तात्रय घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी नितीन घुले, अरुण दळवी, निलेश घुले, तानाजी तोंडे, संतोष घुले, खंडू निकम व शाळा व्यवस्थापन समिती ने आर्थिक सहकार्य केले.
———-&——-
फोटो
नृत्यकला सादर करताना इयत्ता पहिलीचे विद्यार्थी
जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानित महिला

प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents