शिंगाडवाडी येथे महिलेला सुनेकडुन व मुलाकडून मारहाण

Spread the love
शिंगाडवाडी येथे महिलेला सुनेकडुन व मुलाकडून मारहाण
शिक्रापूर : शिंगाडवाडी येथे किरकोळ वादातून आपल्याच मुलासह सुनेन महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
शिंगाडवाडी ता. शिरूर येथील संगीता शिंगाडे यांना गावी जायचे असल्याने त्यांनी त्यांचा मुलगा तुळशीराम व सुन, सुनीता यांच्याकडे पैसे मागितले, दरम्यान त्यांच्यात वाद झाला, यावेळी मुलाने व सुनेने महिलेला शिवीगाळ, दमदाटी, व लाकडी दांडक्याने मारहाण करत जखमी केले आहे.
सदर महिला (संगीता शिंगाडे वय.40 रा. शिंगाडवाडी ता. शिरूर. जि. पुणे )यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी (मुलगा,तुळशीराम शिंगाडे व सुन,सुनीता तुळशीराम शिंगाडे रा. शिंगाडवाडी ता. शिरूर जि. पुणे ) या दोघांवर गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.
कु. सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/7350559916

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents