

🔷स्थानिक गॅरेज चालक यांना बोलावून त्यांना सुरक्षा साधने व सुरक्षारक्षक नेमणे बाबत सूचना देऊन त्याचे महत्त्व सांगितले.
🔷17 हजर गॅरेज चालकांनी त्यास होकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.
🔷 तसेच गॅरेज चालक यांना त्यांची गॅरेज व त्यांचे निवासस्थानी सीसीटीव्ही सायरन लावणे बाबत आवश्यकता पटवून दिली.
🔷 तसेच त्यांचे राहते ठिकाणी ग्रामसुरक्षा दल व पोलीस मित्र यांनी रात्रगस्त घातल्यास चोऱ्यांना प्रभावीपणे आळा बसेल.
🔷 नागरिक व पोलिसांनी मिळून रात्रगस्त घातल्यास चोरीचे कारवायांना आळा घालता येईल याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
🔷 सध्या काही मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत. त्यांना मोबाईल पासून दूर करून रात्रीच्या वेळी मैदानी खेळ वॉलीबॉल बास्केटबॉल किंवा बॅडमिंटन इत्यादी खेळ खेळल्यास चोरांना त्या परिसरात चोरी करण्यास प्रतिबंध होईल याबाबत माहिती दिली.
(यशवंत नलावडे)
पोलीस निरीक्षक आळेफाटा पोलीस स्टेशन
बातमीदार :- सुदर्शन रविंद्र मंडले