
रोहकल रोड शेळी मार्केट शेजारी शेवकरी यांच्या सामायिक विहिरीमध्ये सात दिवसापूर्वी एक कुत्रा पडला होता . तीन दिवसापूर्वी हितेश घोगरे, विक्रांत चौधरी, सोनू भुजबळ, व राहुल देशमुख यांनी प्रयत्न केले होते परंतु त्यांचे प्रयत्न असफल ठरल्यामुळे.आज सकाळी साडेनऊ वाजता पुन्हा नवीन जोमाने चाकण रेस्क्यू टीम व आपदा मित्र यांच्या संयुक्त विद्यमानाने त्या कुत्र्याला वाचवण्यात यश आले प्रथमता त्या विहिरी वरती बापूसाहेब सोनवणे हितेश घोगरे श्रीराम पाटील रत्नेश शेवकरी, रावसाहेब ढेरंगे ,राजू शेठ जगनाडे,अतुल सोनवणे,राहुल देशमुख, श्रीकांत साळुंके उपस्थित होते. त्या विहिरीमध्ये बापूसाहेब सोनवणे, हितेश घोगरे , विक्रांत चौधरी, श्रीकांत पाटील हे प्रथमता विहिरीत उतरले व जवळपास दीड तास त्या कुत्र्याला त्यांचा पकडण्याचा संघर्ष चालू होता. पण दीड तासानंतरही यश येत नव्हते त्यावेळेस त्यांना जाणवले अजूनही आपणाला रेस्क्यू टीमची गरज आहे त्यावेळी त्यांनी राहुल देशमुख व रावसाहेब ढेरंगे यांना आवाज देऊन विहिरीत बोलावले कुत्रा खूप दिवसाचा उपाशी असल्या कारणास्तव त्याला बिस्किट, पाव खायला देण्यात आले कुत्रा खूप दिवसापासून विहिरीत असल्यामुळे तो खूप अग्रेसिव्ह होता त्यामुळे यांनी पकडण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर कुत्रा यांच्याकडे जोराने धावून येत होता पण काही काळानंतर राहुल देशमुख व रावसाहेब ढेरंगे विहिरीमध्ये उतरले व या सहा जणांनी कुत्र्याला पकडून त्याला कोणतीही इजा होणार नाही या पद्धतीने त्याची काळजी घेऊन त्याला पकडून बांधण्यात आले या सहा जणांना रत्नेश शेवकरी ,विशाल बारवकर, अतुल सोनवणे, साहिल सोनवणे, संजय देशमुख, पप्पू देशमुख, शिवलिंग सोनवणे, निरंजन परदेशी, योगेश जगताप व विहीर मालक विहिरीच्या काठावरून मार्गदर्शन करत होते.पिशवीच्या साह्याने कुत्र्याला विहिरीच्या काठी उभे असलेल्या रत्नेश शेवकरी ,विशाल बारवकर, यांच्या साह्याने वरती घेण्यात आले वर आल्यानंतर त्याला कोणतीही इजा झालेली नाही हे बघून त्याला मुक्त करण्यात आले. ह्या चाललेल्या तीन तासांच्या खडतर प्रयत्नातून कुत्र्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.कुत्रा बाहेर काढल्यानंतर विहिरीमध्ये उतरलेले रेस्क्यू व आपादा मित्र प्रथमता श्रीराम पाटील ,बापूसाहेब सोनवणे ,श्रीकांत साळुंके, रावसाहेब ढेरंगे, हितेश घोगरे व सर्वात शेवटी विहिरीमध्ये असलेले सर्व रेस्क्यू चे साहित्य वर काढून दिल्यानंतर सर्वात शेवटी राहुल देशमुख वर आले व सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला व एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि अखेर हे रेस्क्यू सर्वांनी मिळून पूर्ण केले.
प्रतिनिधी संपादक लहू लांडे 9370612656 /8007686970