

विषय ग्राम सुरक्षा दल स्थापन करून घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे.
आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत चोरी घरपोडी यांची संख्या वाढत आहे. त्या आळा घालण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी व रात्रगस्तीचे नियोजन नियमित केले जाते.
आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत दुर्गम भागात दूर दूर पर्यंत लोक वस्ती असल्याने सर्व गावात पोलीस पोहोचू शकत नाही.
यासाठी ग्राम सुरक्षा दल स्थापन करून वाड्यावर त्यांची सुरक्षा करणे कामी तरुणांना व इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी
नलवणे,सुरकुळवडी,
नवलेवडी, या नगर हद्दलगतच्या गावात आज ग्राम सुरक्षा दलाचे गस्त सुरू करणेसाठी ग्रामस्थांची मिटिग घेतली.
त्यास गावकऱ्यांनी व तरुणांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.
CCTV, सायरन, कुत्रा पाळणे, तसेच रात्री झोपताना आपल्या वाड्या वस्ती त्यातील किमान 5 लोक, व बाजूचे वाड्या वस्तीतील 5 लोक यांना रात्री झोपताना कॉल करणे. म्हणजेच अचानक गरज असल्यास तात्काळ संपर्क करणे सोयीचे होईल सूचना दिल्या.
(यशवंत नलावडे)
पोलीस निरीक्षक आळेफाटा पोलीस ठाणे पुणे ग्रामीण.
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर