दिनांक १७.०३.२०२३
पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश गायवळ व इतर दोघांचे अनधिकृत फ्लेक्स लावले प्रकरणी हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

Spread the love
दिनांक १७.०३.२०२३
पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश गायवळ व इतर दोघांचे अनधिकृत फ्लेक्स लावले प्रकरणी हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
हिंजवडी पोलीस स्टेशन हददीत चांदणी चौकात पाईपलाईन हायवे रोड लगत निलेश गायवळ याचे तसेच इतर दोघांचे वाढदिवसानिमीत्त अनधिकृत फ्लेक्स लावल्याने हिंजवडी पोलीस स्टेशन व पुणे महानगरपालीका बावधन क्षेत्रीय कार्यालय यांचे पथकाने संयुक्त कारवाई करून सदरचे अनधिकृत फ्लेक्स काढुन टाकले आहेत.
निलेशभाऊ गायवळ युथ फाउंडेशनचे सदस्य व इतर दोघांवर अनधिकृत फ्लेक्स लावले प्रकरणी निलेश काळुराम घोलप परवाना निरीक्षक कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय यांनी दिले फिर्यादीवरून हिंजवडी पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहीता कलम १८८ व महाराष्ट्र मालमत्तेचे विदुपीकरणास प्रतिबंधक कायदा १९९५ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents